-
सर्दी, खोकला आणि नाक बंद होण्याचा त्रास सुरू झाला की, अनेक घरांमध्ये ओव्याचे तेल वापरण्यात येते. पिढ्यान् पिढ्या हा घरगुती उपाय चालत आल्याने लोकांचा त्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ओव्याचे तेल
ओव्याच्या बियांपासून तयार केले जाते. या तेलामध्ये उष्ण गुणधर्म असल्यामुळे थंडीमुळे होणाऱ्या त्रासात काही प्रमाणात आराम मिळू शकतो, असे आयुर्वेदात मानले जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सर्दीवर सहायक उपाय
मात्र, संशोधनानुसार ओव्याचे तेल औषधासारखा झटपट परिणाम देत नाही. सर्दी बरी होण्यासाठी शरीराला नैसर्गिक वेळ लागतो आणि ओव्याचे तेल हा केवळ सहायक उपाय ठरतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पचन सुधारण्यास फायदेशीर
सर्दी झाल्यावर अनेकांना पचनाचा त्रास जाणवतो. आयुर्वेदात ओव्याचा वापर पचन सुधारण्यासाठी केला जातो. पचन हलके झाल्यास शरीराला एकूणच आराम मिळतो आणि सर्दीचे त्रास सहन करणे सोपे जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
घशाची खवखव कमी करण्यास उपयुक्त
ओव्याचे तेल उष्ण असल्यामुळे घसा आणि छातीत तात्पुरता उबदारपणा निर्माण होतो. त्यामुळे घसा खवखवणे किंवा कोरडा खोकला काही वेळासाठी कमी झाल्यासारखा वाटतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
संसर्गायुद्धात शरीराला आधार
अभ्यासांमध्ये ओव्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म आढळले आहेत. त्यामुळे संसर्गाशी लढताना शरीराला थोडा आधार मिळू शकतो; मात्र त्यामुळे सर्दी लगेच बरी होते, असे म्हणता येत नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ओव्याच्या विविध उपायांचा वापर
घरगुती उपायांमध्ये ओव्याचा काढा, ओव्याचे पाणी किंवा ओव्याची वाफ यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा उपाय आरामदायक असला तरी त्यांचा परिणाम तात्पुरताच असतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वाफेमुळे कफ सैल होण्यास मदत
नाक बंद होण्यावर ओव्याची वाफ घेणे काही जणांना अधिक परिणामकारक वाटते. वाफेमुळे कफ सैल होतो आणि श्वास घेणे काही काळासाठी सोपे होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
तज्ज्ञांच्या मते, ओव्याचे तेल अतिशय तीव्र असल्याने त्याचा अतिरेक टाळून, कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापर करावा. सर्दी साधारणपणे काही दिवसांत आपोआप बरी होते. मात्र, त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
निवृत्त झाल्याच्या महिन्याभरातच माजी सरन्यायाधीश गवई यांनी स्वीकारले नवे पद, आता…