-
वय वाढणं ही सामान्य गोष्ट आहे. पण, वाढत्या वयासोबत त्वचासुद्धा वृद्ध होत जाते. पण, काही व्हिटॅमिन्स शरीरातील स्नायूंना कणखर, त्वचेला तजेलदार बनवते; त्यामुळे एजिंग इशू होत नाही. हे व्हिटॅमिन्स कोणते हे जाणून घ्या व तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचे सेवन करा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
व्हिटामिन क यामुळे पांढऱ्या पेशी वाढतात, तसेच लवचिकता वाढते; त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते. अशक्त वायुंना सशक्त करते. दैनंदिन जीवनात व्हिटामिन क खाल्ल्याने त्वचेला फायदा होतो, प्रतिकारशक्ती वाढते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
व्हिटामिन ड हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटामिन ड फायदेशीर असते. तसेच ती रोगप्रतिकारशक्ती वाढवते, हार्मोनल बॅलेन्स करण्यात मदत करते. सूर्यकिरणांमुळे हाडांची समस्या कमी होते. काही कमजोरी वा दुखणे असेल तर नाहीसे होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
व्हिटामिन ई अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले व्हिटामिन ई पेशींना तरुण ठेवतात, त्यामुळे त्वचा नेहमी तरुण दिसते. जर आपल्या पेशी आतून खराब असतील तर त्यालाही व्हिटामिन ई तंदुरूस्त करते. हे हिरव्या भाज्यांतून, माश्यांत, अंड्यात असते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
व्हिटामिन बी कॉम्पलेक्स चयापचय क्रिया सुधारते. स्नायूंचा ताण कमी करून मजबूत करते, त्यामुळे तरुण दिसण्यास मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
व्हिटामिन के सुक्या मेव्यातून मिळणारे व्हिटामिन के हाडांचे व धमन्यांचे आरोग्य सुधारते. त्वचेला लवचिक करून सुरकुत्या घालवते, त्यामुळे तुम्ही चिरतरुण दिसता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कसे बॅलेन्स कराल व्हिटामिन शरीरात जाणे खूप गरजेचे असते. सप्लिमेंटसोबत, डायेट प्लॅन करून, रोज व्यायाम करून, व्यवस्थित झोप घेऊन, ताणतणाव कमी केल्याने तुम्ही एजिंग कमी करू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम