-
अभिनेत्री सना मकबूलचा ब्रेकअप झाला आहे. तिने स्वतः याबद्दल सांगितलं आहे.
-
सना मकबूल बिग बॉस ओटीटी ३ ची विजेती ठरली होती. या शोमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
-
सना मकबूलचं तिच्या बिझनेसमन बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं.
-
सनाने तिने बिग बॉस ओटीटी ३ मध्ये एंट्री घेतली, तेव्हा ती बिझनेसमन श्रीकांत बुरेड्डीला डेट करत होती. त्यांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू होत्या. पण शो संपल्यानंतर, २०२५ च्या सुरुवातीला त्यांचे ब्रेकअप झाले.
-
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली की जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू लागता तेव्हा नात्यांमध्ये अडचणी येऊ लागतात.
-
अनेकदा असं म्हटलं जातं की पुरुष खंबीर महिलांबरोबर राहू शकत नाही आणि हे अगदी खरं आहे. पुरुष आमच्यासारख्या महिलांना हँडल करू शकत नाहीत. मी स्वतः हे अनुभवले आहे, असं सना मकबूल म्हणाली.
-
सना म्हणाली, “माझ्या नात्यात मी करिअरमध्ये त्या व्यक्तीच्या पुढे जात होते, ते त्याला आवडलं नाही. म्हणून मला वाटतं की अजूनही महिला आणि पुरुष समानता नाही.”
-
सना म्हणाली, “मी अशीच आहे, आणि तुम्हाला मला असंच स्वीकारावे लागेल. मी तुमच्याशी जुळवून घेऊ शकते, पण तुम्हाला मला स्वीकारावे लागेल. मला जगाची पर्वा नाही. पण जर माझ्या वैयक्तिक यशामुळे नातेसंबंध बिघडत असतील तर ती एक समस्या आहे.”
-
सना पुढे म्हणाली, “मी म्हणेन की जेव्हा मुलगी खंबीर असते तेव्हा तिला नात्यात स्वीकारणं कठीण असतं. पुरुष अशा महिलांना स्वीकारू शकत नाहीत. त्यांना वाटते, ‘अरे, ती माझ्यापेक्षा चांगली काम करत आहे. तिला खूप लोक पसंत करतात.’ ते असुरक्षित होतात. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात याचा सामना केला आहे. तो माझ्यावर प्रेम करत होता, पण अचानक त्याला अनेक गोष्टींमध्ये अडचण वाटू लागली. कारण मी बदलले नव्हतेच.”
‘CJP आंदोलकाला नोटीस पाठवायची तुमची हिंमत कशी झाली?’ सरन्यायाधीश सूर्य कांत का संतापले?