-
उत्तम शाकाहारी जेवण ज्या ठिकाणी मिळतं अशी जगभरातली रेस्तराँ कुठली आहेत याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत अशी ही रेस्तराँ आहेत
-
‘चटणी मेरी’ हे लंडन येथील एक भारतीय पाककृती बनवणारं रेस्तराँ आहे. तंदूरी भाज्या, रस्सा भाज्या, पोळी रोटी, भाताचे विविध प्रकार हे सगळं या शाकाहारी रेस्तराँमध्ये मिळतं. लंडनला भेट देणारे भारतीय या रेस्तराँलाही आवर्जून भेट देतातच.
-
इलेव्हन मॅडिसन पार्क हे जगातील सर्वोत्तम व्हेज रेस्तराँपैकी एक आहे. न्यूयॉर्क या ठिकाणी हे रेस्तराँ आहे. भारतीय मसाले, भारतीय पदार्थ, शाकाहारी पदार्थांसाठी हे रेस्तराँ प्रसिद्ध आहे.
-
लंडन या ठिकाणी असलेलं गॉथियर सोहो हे रेस्तराँही शाकाहारी जेवणाची भूक भागवणारं उत्तम असं एक रेस्तराँ आहे. या फ्रेंच रेस्तराँने अल्पावधीतच जगातल्या खवय्यांना भुरळ घातली आहे.
-
जगातल्या शाकाहारी भोजनालयांबाबत आम्ही सांगत आहोत आणि यातलं एक रेस्तराँ मुंबईतलंही आहे. मुंबईतल्या भुलेश्वर-काळबादेवी भागात श्री ठाकर भोजनालय आहे. या ठिकाणी असलेली गुजराती थाळी ही जगभरातल्या खवय्यांना आवडते यात शंका नाही. सचिन तेंडुलकर, राज ठाकरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचं हे आवडतं रेस्तराँ आहे.
-
टेरे आ टेरे हे युनायटेड किंग्डममधील ब्रायटनमधलं रेस्तराँही जगातल्या सर्वोत्तम शाकाहारी रेस्तराँपैकी एक आहे. इथल्या स्टायलीश व्हेज भाज्यांची लज्जत काही औरच. या ठिकाणी शाकाहारी जेवण झालं की खवय्ये समाधानाचा ढेकर देतात यात शंकाच नाही.
-
या यादीतलं सहावं रेस्तराँ आहे ऑस्ट्रेलियाचं कॅनबेरा. उत्तम शाकाहारी पदार्थ, उत्तम पाककृती या सगळ्या या खास शाकाहारी रेस्तराँमध्ये खाण्यास मिळतात. ऑस्ट्रेलियाला भेट देणारे भारतीय या रेस्तराँमध्ये जातातच.
“उद्धव ठाकरेंना राग आला आणि त्यांनी…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?