-
आपण ज्या भांड्यांत जेवण करतो त्या भांड्याचा शरीरावर प्रभाव पडतो, त्यामुळे जेवण्याच्या भांड्यांची निवड करण्याआधी हे नक्की वाचा. अभ्यासातून हे समोर आले आहे की, काही भांड्यांच्या वापरामुळे शरीराला हानी पोहचते, त्यामुळे स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणे उत्तम असते. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
स्टीलची भांडी वापरण्याचे फायदे : कमी वेळात जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलची भांडी योग्य पर्याय असतात. स्टीलची भांडी पटकन तुटत नाहीत व दीर्घकाळ वापरता येतात. ती धुण्यास सोपी असून डाग किंवा वास पटकन राहत नाही. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
आहारासाठी सुरक्षित : स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात लिंबू, टोमॅटो असे आंबट पदार्थ वापरले तरी फरक पडत नाही. यात बनवलेल्या पदार्थांचा रंग, चव बदलत नाही. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
जीवाणू टीकत नाही : स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना छिद्र नसतात, त्यामुळे त्यात खरकटे, दुर्गंध, जीवाणू रहात नाहीत. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
केमिकलपासून संरक्षण : नॉन्स्टिक भांड्यांसारखे यावर कोणतेही केमिकलचे कोटिंग नसते. जास्त गरम झाल्यावरसुद्धा यातून कोणताही गॅस किंवा धूर निघत नाही. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
हानिकारक धातूविरहित : स्टेनलेस स्टीलमध्ये कोणत्याही हानिकारक धातूचा वापर केला जात नाही, त्यामुळे त्यात जेवण बनवणे सुरक्षित असते. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
धुण्यासाठी सोपे : स्टेनलेस स्टीलची भांडी साबण वा पाण्याने धुतल्यास स्वच्छ होतात. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात कोणताही डाग वा जीवाणू रहात नाही. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
“उद्धव ठाकरेंना राग आला आणि त्यांनी…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?