-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो.
-
पंचांगानुसार, ९ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ०४ मिनिटांनी सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून 0 डिग्री कोणीय अंतरावर स्थित असेल. ज्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होईल, ज्याला मंगलादित्य राजयोग देखील म्हटले जाईल. २०२६ मधील हा पहिला मंगलादित्य राजयोग असेल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ आणि सूर्य एकत्र येऊन एखादा योग निर्माण करतात. ज्यामुळे शक्ती, साहस निर्माण होतो. हा योग काही राशींसाठी नक्कीच लाभदायी ठरू शकतो. -
मेष राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.
-
हा शुभ राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल.
-
धनु राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील.
-
मंगळ-सूर्याचा योग कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पोटातील घाण कशी साफ कराल? बाबा रामदेवांनी सांगितला सोपा उपाय; सकाळी ‘हे’ खाल्लंत तर पोट लगेच होईल मोकळं!