-
कलर्स मराठी वाहिनीवरून घराघरांत पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकतंच तिच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे कांची शिंदे.
-
कांची शिंदे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिनं नवीन घर घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीनं नुकताच तिच्या नव्या घरात प्रवेश केला. या गृहप्रवेशाचे खास फोटो आणि कुटुंबीयांबरोबरचे खास क्षण तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
२०२५ या वर्षाच्या शेवटच्या, म्हणजेच डिसेंबर महिन्यात २७ तारखेला कांचीनं स्वतःच घर घेतलं. “आमच्या हक्काचं घर” अशी कॅप्शन देत अभिनेत्रीनं नव्या घराबद्दलची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली.
-
नवीन घर घेतल्याबद्दल कांचीवर कलाविश्वातील कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला. विदिशा म्हसकर, रसिका वखारकर, किरण गायकवाड, अनिता दाते-केळकरसह अनेकांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या.
-
‘इंद्रायणी’ मालिकेत अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंद्रायणीची भूमिका साकारत आहे. तिच्या आधी छोट्या इंदूच्या भूमिकेत बालकलाकार सांची भोयर पाहायला मिळाली होती.
-
कांची शिंदे मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेआधी कांची शिंदे ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेत कांची दिसली होती. यामध्ये तिने चमकी ही भूमिका साकारली होती.
-
दरम्यान, कांची शिंदे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती उत्तम लावणी नृत्यांगणाही आहे. ती लावणीचे शो करते आणि वर्कशॉपही घेते. लावणीचे अनेक व्हिडीओही कांची तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
कांची शिंदेची मुख्य भूमिका असलेली इंद्रायणी मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेचं कथानक तसंच अधोक्षज यांची जोडीसुद्धा प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत