-
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची थीम आहे ‘दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार’. त्यामुळे या थीमनुसार यंदाचं घर कसं सजवलं जाणार याची झलक पाहण्यासाठी सगळे आतुर झाले होते. अखेर घराची पहिली झलक अखेर प्रेक्षकांसमोर आली आहे. फोटोत दिसतंय ते यंदाचं भव्य प्रवेशद्वार आहे. मुख्यप्रवेशद्वारावर टाळं, चावी आणि दरवाजा या थीमनुसार डिझाइन केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
हा आहे बिग बॉसच्या घरातील गार्डन एरिया. याठिकाणी गेल्यावर्षीच्या सीझनप्रमाणे यंदाही स्पर्धकांसाठी खास गॉसिप कॉर्नर तयार करण्यात आला आहे.
-
बिग बॉस मराठीच्या घरात नेहमीप्रमाणे मोठं स्विमिंगपूल आणि फिटनेस फ्रीक स्पर्धकांसाठी जिम एरिया डिझाइन करण्यात आला आहे.
-
यंदाही घरात बाल्कनी सेक्शन आहे. याठिकाणी मोठ्या अक्षरात Bigg Boss असं लिहिण्यात आलं आहे.
-
मुख्य घरात आल्यावर उजवीकडे आहे लिव्हिंग एरिया. याच ठिकाणी दर वीकेंडला रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची शाळा घेणार आहे.
-
ही आहे बिग बॉस मराठीच्या घराची बेडरूम.
-
लिव्हिंग आणि किचन एरियाच्या मध्यभागी सहभागी स्पर्धकांसाठी मोठं डायनिंग टेबल ठेवण्यात आलं आहे. या खुर्च्यांना सुद्धा यंदाच्या थीमप्रमाणे सजवण्यात आलं आहे. या खुर्च्यांवर तुम्ही चाव्यांचं डिझाइन असल्याचं पाहू शकता.
-
हे आहे ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचं किचन. स्पर्धकांसाठी भांडी, प्रत्येकासाठी वेगवेगळे कॉफी मग, फ्रीज अशा सगळ्या व्यवस्था याठिकाणी उपलब्ध आहेत.
-
किचनच्या अगदी बाजूला आहे स्टोअर रूम. यावर लिहिलंय टेलिफोन…त्यामुळे यावर्षी बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना टेलिफोन वापरायला मिळेल का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.
-
स्टोअर रूमच्या बाजूला दोन आरामदायी चेअर्स ठेवून खास सिटिंग एरिया डिझाइन करण्यात आला आहे.
-
यावर्षी बेडरूममध्ये एकच सिंगल बेड आहे. बाकी सगळे डबल बेड आहेत. याशिवाय बेडरूमच्या भिंतीवर प्राण्यांचे फोटो लावले आहेत. यामुळे बेडरूमला रॉयल लूक मिळाला आहे.
-
बेडरूममध्ये यावर्षी आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय तो म्हणजे बंक बेड. ही आगळीवेगळी संकल्पना पहिल्यांदाच आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.
-
यंदा कॅप्टन रूमला एकदम लॅव्हिश लूक देण्यात आला आहे. वाइन कलर थीममध्ये कॅप्टन रूम सजवण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे कॅप्टन रूमच्या जवळ वेगळं वॉशरूम सुद्धा आहे.
-
हे आहे बिग बॉस मराठीच्या घरातील कॉमन वॉशरूम. यालाही थीमनुसार आगळावेगळा लूक देण्यात आला आहे.
-
बिग बॉसच्या घरात यावर्षी लिव्हिंग रूममध्ये एक छोटीशी खोली डिझाइन करण्यात आली आहे. गुलाबी रंगाच्या थीमनुसार ही खोली सजवण्यात आली असून संपूर्ण खोलीला रॉयल लूक देण्यात आला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : लोकसत्ता ऑनलाइन/ प्रदीप पवार )
रुपाली ठोंबरे पाटील यांच्या टीकेला विद्यानंद बापटांचे प्रत्युत्तर! म्हणाले, “हा तर तार्किक खोटारडेपणा, लोकमान्य टिळकही…”