-
Health Benefits Of Pumpkin Seeds For Men: भोपळ्याच्या बिया हे केवळ चविष्ट नसून ते पोषक तत्वांचा खजिना आहेत.
-
यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक ठरतात.
-
भोपळ्याच्या बियांमधील झिंक पुरुषांमधील मुख्य हार्मोन टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करते. यामुळे शारीरिक ऊर्जा आणि कार्यक्षमता टिकून राहते.
-
या बियांच्या नियमित सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते, ज्याचा सकारात्मक परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमेतेवर होतो.
-
यामध्ये असलेले ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स हृदयासाठी वरदान मानले जातात.
-
हे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
-
रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठीही भोपळ्याच्या बियांचे सेवन फायदेशीर आहे.
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसाला साधारण १ ते २ चमचे (सुमारे ३० ग्रॅम) भोपळ्याच्या बियांचे सेवन पुरेसे आहे.
-
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही आहार सुरू करण्यापूर्वी किंवा आहारात मोठे बदल करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे