-
Health Benefits Of Turmeric Milk In Winter 2026: हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते आणि वारंवार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
जर तुम्हाला सांधेदुखी किंवा हाडांच्या समस्या असतील, तर हळदीचे दूध अत्यंत गुणकारी ठरते.
-
हवामान बदलल्यामुळे होणारा खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे यावर हळदीचे दूध हा सर्वात जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
-
हे फुफ्फुसांतील साचलेला कफ बाहेर काढण्यास मदत करते.
-
रात्री हळदीचे दूध प्यायल्याने पचन संस्था सुरळीत चालते.
-
गॅस, अपचन किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या यामुळे दूर होतात.
-
ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते.
-
यामुळे मेंदूला शांतता मिळते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
-
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
आश्वासनांचे गाजर अन् रस्त्याऐवजी खड्डे; सोलापूर महापालिका, ठेकेदाराच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे केले ठिय्या आंदोलन