-
हिवाळा सुरु झाला की, सर्दी, खोकला, ताप आपली पाठ काही केल्या सोडत नाही. यासाठी किती वेळा डॉक्टरांकडे जायचे असा प्रश्न आपल्यातील प्रत्येकालाच पडतो. मग यासाठी आपण कधी कधी घरगुती उपायांकडे वळतो. भरपूर खोकला असेल तर खडीसाखर तोंडात ठेवतो, सर्दी झाली असेल तर गरम पाण्याची वाफ घेतो किंवा मग नाक आणि घशाला विक्स लावून झोपून जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
‘कुमकुम: एक प्यारा सा बंधन’ फेम अभिनेत्री जुही परमार सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असते. नुकतंच तिने खोकल्यावरचा घरगुती उपाय सांगत व्हिडीओ देखील शेअर केला आहे. जेव्हा हवामान बदलते, तेव्हा आपल्या शरीराला त्याची सर्वात आधी जाणीव होते. त्याबरोबर त्रासदायक खोकलाही येतो. त्यामुळे साधा घरगुती उपाय नेहमीच प्रभावी ठरतो ज्याने आराम मिळू शकतो असे तीने कॅप्शनमध्ये म्हंटले आहे. तर नक्की हा उपाय खोकल्यासाठी कशाप्रकारे काम करतो त्याचबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर नक्की काय आहे हा उपाय?
थोड्या मधात काळी मिरी पावडर, आल्याचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करा आणि त्यांचे सेवन करणे होय.
हा उपाय खरंच काम करतो का?
केआयएमएस हॉस्पिटल्स, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ, डीटी अमरीन शेख यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जेव्हा ऋतू बदलतात, तेव्हा अनेकांना त्याचा परिणाम सर्वप्रथम घशात जाणवतो. सुरुवातीला थोडासा असलेला खोकला योग्य काळजी घेतली नाही तर वाढत जातो. छातीत जडपणा, थंड किंवा कोरड्या हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळीच साधे घरगुती उपाय पुन्हा दैनंदिन जीवनात आपण घेऊन येतो. जसे की, मध, काळी मिरी आणि आल्याचा रस यांचे मिश्रण. अनेक घरांमध्ये याचा उपयोग केला जातो. तयार करायला जितकं सोपं असतं; तितकंच त्वरित आराम सुद्धा देतो. पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तिन्ही पदार्थ एकत्र मिळून खोकल्यासाठी सौम्य पण प्रभावीपणे काम करतात. (फोटो सौजन्य: @Freepik) -
मध, आले आणि काळी मिरी खोकल्यासाठी रामबाण उपाय ठरू शकता का?
तर या प्रत्येक पदार्थाचे विशिष्ट फायदे आहेत…
तिन्ही दोन्ही एकत्र घेतल्यावर घशातील त्रास कमी होतो, शरीरातील कोरडेपणा व सूज (इन्फ्लेमेशन) कमी होऊन लवकर बरे वाटायला मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
हा उपाय सर्वांसाठी सुरक्षित आहे का?
आपल्यातील अनेक जण या मिश्रणाचे सेवन अगदी बिन्दास्त करू शकतात. परंतु काही लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देऊ नये. ज्या लोकांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यांना आले किंवा काळी मिरीचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्या मंडळींना हे मिश्रण घेतल्यानंतर घशात किंवा पोटात जळजळ जाणवल्यास त्याचे सेवन थांबवावे. हा उपाय आराम देईल. पण, सेवनानंतर गंभीर लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik) -
उत्तम परिणामांसाठी या मिश्रणाचे सेवन कसे करावे?
या मिश्रणाचे हळूहळू सेवन केल्यास फायदा होईल. जसे की, मध घशाला लागतो. सुरुवातीच्या किंवा हंगामी खोकल्यासाठी दिवसातून एक किंवा दोनदा थोड्या थोड्या प्रमाणात सेवन करणे पुरेसे आहे. अनेकांना विशेषतः संध्याकाळी सेवन केल्यास आरामदायी वाटू शकते. कारण – रात्री झोपताना येणारा खोकला कमी करण्यास मदत होते. ताज्या आल्याचा रस आणि उच्च-गुणवत्तेचा मध वापरल्यास आणखीन चांगला अनुभव तुम्हाला येऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik) -
कोणती गोष्ट लक्षात ठेवावी?
हवामानातील अचानक बदलांमुळे होणाऱ्या सौम्य, त्रासदायक खोकल्यासाठी हा उपाय योग्य आहे. पण, जर खोकला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकला, त्यामुळे ताप, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे किंवा असामान्य थकवा येत असेल, तर शरीर कदाचित काहीतरी अधिक गंभीर समस्येचे संकेत देत आहे. (फोटो सौजन्य: @Freepik) -
घरगुती उपाय तुमच्या शरीराला, तुम्हाला बरं वाटण्यास आधार देतात. पण, शरीराच्या मर्यादांची जाणीव ठेवून; त्यांचा वापर केल्यास आणखीन चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. खोकल्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे स्वयंपाकघरातील परिचित घटकांवर विश्वास ठेवण्याइतकेच महत्त्वाचे आहे; असे तज्ज्ञ म्हणाले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
BMC Ward Wise full Winners List 2026 : मुंबईतील कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकलं? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!