-
अनेकदा सालीवर तपकिरी डाग असलेली केळी दिसताच ती फेकून देण्याचा विचार केला जातो. मात्र, अतिपक्व झालेली केळी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात, असे अलीकडील संशोधन आणि पोषणविषयक अभ्यास सूचित करतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
केळी जसजशी अधिक पिकतात, तसतसे त्यांच्यातील काही जैवसक्रिय घटक (Bioactive compounds) आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढत जाते. हे घटक शरीराच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
अतिपिकलेल्या केळ्यांचे वैशिष्ट्य काय?
‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, केळी पिकण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यातील स्टार्चचे रूपांतर हळूहळू नैसर्गिक साखरेत होते. याच प्रक्रियेसोबत अँटी-ऑक्सिडंट्सची क्रियाशीलताही वाढते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
मुक्त कण (Free Radicals) शरीरावर काय परिणाम करतात?
शरीरात तयार होणारे ‘मुक्त कण’ दाह (Inflammation) वाढवतात, पेशींना हानी पोहोचवतात आणि अकाली वृद्धत्वासाठी कारणीभूत ठरतात. अँटी-ऑक्सिडंट्स हे मुक्त कण निष्क्रिय करून पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
संशोधनातून काय समोर आले?
प्रयोगशाळा स्तरावर झालेल्या काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, अतिपिकलेल्या फळांमधील विशिष्ट संयुगे पेशींच्या नैसर्गिक कार्याला आधार देतात आणि शरीरातील पेशीय संतुलन राखण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
आहारातील महत्त्व
केळी हे कोणत्याही गंभीर आजार किंवा कर्करोगावर उपचार नसले तरी संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा समावेश केल्यास एकूण आरोग्याला चालना मिळू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
अतिपिकलेली केळी पचनासाठी का चांगली?
अतिपक्व केळी अधिक गोड असून पचनासाठी ती हलकी असतात. त्यामुळेच ती स्मूदी, ओट्स, केक तसेच आरोग्यदायी बेकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
तज्ज्ञांच्या मते, आहार केवळ पोट भरण्यापुरता मर्यादित नसून, तो शरीराला आवश्यक पोषण देतो. नैसर्गिक आणि संपूर्ण अन्नपदार्थांचे नियमित सेवन दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि अतिपक्व केळी हे याचे उत्तम उदाहरण आहे. ( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
Akshay Kumar : मुंबईत बेदरकार मर्सिडीजमुळे अक्षय कुमारच्या गाडीला अपघात, इनोव्हा थेट दोन चाकांवरच उभी राहिली; रिक्षाचा चक्काचूर