-
तुम्ही पाळत असलेले मासे तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करूनही ते सातत्याने मृत होत आहेत का असेल. काळजी करू नका. कारण- ही समस्या असणारे तुम्ही एकटे नाही आहात. अनेक नवीन मासेपालकांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो. ते खूप उत्साहाने फिश टँकद्वारे मत्स्यपालनास सुरुवात करतात; परंतु त्यांच्याकडील मासे काही दिवसांपेक्षा जास्त काळ जगत नाहीत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नायट्रोजन चक्र नसणे तुमच्या घरातील माशांच्या टाकीत नायट्रोजन चक्र कार्यान्त्वित करणे म्हणजेच ‘सायकलिंग’ ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. ती न करताच मासे घाईघाईने टाकीमध्ये सोडल्यास काही दिवसांतच त्यांचा मृत्यू होतो. मत्स्यालयांना फायदेशीर जीवाणूंची आवश्यकता असते, जे माशांचा कचरा आणि त्यांच्या शिल्लक अन्नापासून तयार झालेल्या विषारी अमोनियाचे सुरक्षित नायट्रेट्समध्ये रूपांतरितर करतात. त्यात तुमचा मासा सोडण्यापूर्वी काही आठवडे तुम्ही टाकी ‘सायकलिंग’ करीत राहा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
माशांना जास्त खाणे देणे आपल्या लाडक्या माशांसाठी आपण अतिरिक्त अन्न टाकतो. माशांनी न खाल्लेले अन्न कुजते, जे पाण्यात अमोनियाच्या वाढीला चालना देते आणि त्यामुळे माशांमध्ये लठ्ठपणा येतो, जो त्यांच्या आरोग्याला आणखी हानी पोहोचवू शकतो. म्हणून त्यांना जास्त खायला देण्याऐवजी, त्यांना दिवसातून फक्त दोन-तीन मिनिटे, एक-दोन वेळा खायला द्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पाण्याच्या मापदंडांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या टाकीच्या पाण्यात थोडेसे पीएच बदल, बर्फाळ तापमान किंवा क्लोरिन नळाचे पाणी यांमुळे त्यांच्यावर ताण येतो; परिणामी ते लगेचच मरतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
फिश टँकमध्ये गर्दी टँकमध्ये माशांचा जास्त साठा झाल्यास मासे गुदमरतात आणि त्यांच्यावर ताण येतो. त्याऐवजी तुमच्या माशांना आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी त्यांना पोहण्यासाठी पुरेशी जागा आणि लपण्याच्या जागा उपलब्ध करून द्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नियमित टाकीची देखभाल मत्स्यालयांना दर आठवड्याला २५% पाणी बदलावे लागते. त्यामध्ये टाकीच्या भिंती स्वच्छ करणे, जमा झालेले कोणतेही शैवाल काढून टाकणे, रोपांची छाटणी करणे, उरलेले अन्न किंवा माशांचा कचरा काढून टाकणे आणि ते स्वच्छ, डिक्लोरिनेटेड पाण्यात बदलणे या बाबी समाविष्ट आहेत. सक्रिय काळजी परिसंस्था संतुलित ठेवते आणि तुमच्या माशांना निरोगी ठेवण्यास मदत करते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…