-
नवीन वर्ष आयुष्य जगण्याची नवीन संधी घेऊन येते, असे म्हणतात. ही नवीन संधी स्वीकारण्यासाठी नकळत तुम्हाला अंकशास्त्रही मदत करतं. तर त्यासाठी तुम्हाला आधी मूलांक काढावा लागतो. मूलांक काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची बेरीज करावी लागते.
उदाहरणार्थ –
१) जर तुमची जन्मतारीख २८ असेल, तर
२८ = २ + ८ = १०
१० = १ + ० = १
तुमचा मूलांक १ असणार आहे.
२) जर तुमची जन्मतारीख ४ असेल, तर तुमचा मुलांकही ४ असणार आहे. (फोटो सौजन्य: @Freepik) -
तर आज आपण २०२६ हे नवं वर्ष १ ते ९ मूलांक असणाऱ्या मंडळींना कसं जाणार याबद्दल जाणून घेऊयात…
मूलांक १ – जन्मतारीख १, १०, १९, २८ यांना हे वर्ष चांगले जाईल. नोकरी-धंद्यात नवीन संधी प्राप्त होतील, विवाह जमतील, परदेशात जाण्याचा योग व प्रमोशनसुद्धा मिळेल.
मूलांक २ – २, ११, २०, २९ या जन्मतारखांना हे वर्ष सुखदायक ठरेल. कोर्ट-कचेरीची कामे होतील, प्रवासातले योग जुळून येतील आणि परिचयातून विवाह योगसुद्धा जुळून येतील. (फोटो सौजन्य: @Freepik) -
मूलांक ३ – जन्मतारीख ३, १२, २१ व ३० आहे अशा मंडळींचा मूलांक तीन असतो. अशा लोकांची नोकरी आणि उद्योगधंद्यात प्रगती होणार आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूलांक ४ – ज्यांची जन्मतारीख ४, १३, २२ व ३१ आहे अशा लोकांचा मूलांक ४ असतो. ४ हा अंक १ या अंकाचा उत्तम मित्र आहे. त्यामुळे या वर्षी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नयेत. नवीन परिचयात आर्थिक व्यवहार टाळा. विवाह, प्रेमसंबंधात तातडीने निर्णय घेऊ नका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूलांक ५ – ज्यांची जन्मतारीख ५, १४, २९ आहे अशा लोकांना हे वर्ष चांगले जाईल. राजकारण, सामाजिक क्षेत्रात यांना उत्तम यश मिळेल. मात्र, यश टिकविण्यासाठी चुकीची कामे टाळा, प्रलोभनापासून दूर राहा. तसेच जीभ घसरू देऊ नका. पारखून व्यवहार करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूलांक ६ – तुमची जन्मतारीख ६, १५ व २८ आहे अशा लोकांना हे वर्ष विशेषतः आर्थिक बाबतीत चांगले जाईल. कला क्षेत्रातील मंडळीना काम मिळेल आणि त्याचबरोबर नावही होईल. फक्त व्यसनापासून दूर राहावे व आरोग्य जपावे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूलांक ७ – ज्यांची जन्मतारीख ७, १६ व २५ आहे अशा मंडळींना हे वर्ष चांगले जाईल. मात्र, त्यांनी प्रेमसंबंधात अतिरेक टाळावा. काही गोष्टी नम्रपणे हाताळल्यास फायदा होईल.
मूलांक ८ – कोणत्याही महिन्याच्या ८, १६ व २५ तारखेला जन्मलेला लोकांचा मूलांक ८ असतो. या अंकावर शनीचा अंमल असतो. त्यामुळे या लोकांना हे वर्ष काहीसे त्रासदायक आणि कष्टदायक जाईल. त्यामुळे वास्तू, कोर्ट कचेरी, नोकरी-धंद्यात बदल या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. (फोटो सौजन्य: @Freepik) -
मूलांक ९ – जन्मतारीख ९, १८, २७ ज्यांची आहे अशांचा मूलांक ९ येतो. अशा लोकांना २०२६ हे वर्ष उत्तम जाईल. ९ हा १ अंकाचा मित्रांक आहे आणि त्यामुळे या वर्षी नवीन संकल्प पूर्ण होतील. राजकारणात सामाजिक क्षेत्रात आपल्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो. सहसा चुकीची कामे करू नका; प्रकरण अंगाशी येऊ शकते.
ज्यांच्या जन्मतारखेचा भाग्यांक १, २, ३ व ५ आहे, त्यांचा हा भार खूप कमी होईल आणि त्यांच्या रखडलेल्या कामाला यश मिळेल. स्नायूंचे विकार, गुडघेदुखी प्रामुख्याने दिसून येतील.
तर असं काहीसं १ ते ९ या मूलांकांचे वर्ष असणार आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित; मंत्री झिरवाळ कोणाच्या निशाण्यावर? मुख्यमंत्री यांची का घेतली भेट?