-
कढीपत्त्याच्या झाडाला फक्त पाणी देणे नाही पुरेसे; त्याला योग्य पोषण आणि वेळेवर छाटणीदेखील आवश्यक आहे. एका विशेष द्रवरूपी खताची रेसिपीने ही वनस्पती फक्त १० दिवसांत जंगलासारखी वाढू शकते. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
कढीपत्त्याचे झाड पातळ काडीसारखे लांब वाढते. लोकांना वाटते की, त्याला जास्त पाणी दिल्यास ते हिरवे होईल, तर प्रत्यक्षात त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रोपाची छाटणी आणि घरगुती सेंद्रिय द्रावण वापरल्याने त्याची थांबलेली वाढ पुन्हा सुरू होऊ शकते. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
स्वयंपाकघरातील कचरा म्हणजेच काही साले फेकून देऊ नका. कारण- ती कढीपत्त्यासाठी टॉनिकपेक्षा कमी नाहीत. या सालींपासून द्रवरूप खत कसे बनवायचे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा हे जाणून घ्या. तसेच रोपाची वाढ जलद वाढवण्याची पद्धतदेखील जाणून घ्या, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
छाटणी सर्वांत महत्वाची कढीपत्त्याची जाडी वाढवण्यासाठी तुम्हाला प्रथम छाटणी करावी लागेल. जर तुम्ही वरच्या फांद्या कापल्या नाहीत, तर झाड फक्त उंचच वाढेल. जेव्हा तुम्ही वरचा भाग कापता तेव्हा दोन-तीन नवीन फांद्या निघतील. या फांद्या शेवटी झाडाला अधिक दाट बनवतात. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
मातीच्या पृष्ठभागापासून सुमारे पाच इंच अंतरावर कोणत्याही फांद्या किंवा पाने नसावीत. तळापासून निघणाऱ्या कोणत्याही लहान कोंबांना ताबडतोब काढून टाका. जर पानांनी मातीला स्पर्श केला, तर ओलावा बुरशी निर्माण करू शकतो, ज्यामुळे संपूर्ण रोप नष्ट होऊ शकते. तळ उघडा ठेवल्याने हवा आणि सूर्यप्रकाश मुळांपर्यंत योग्यरीत्या पोहोचू शकतो. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
मातीतील ओलावा नियोजन कढीपत्त्याला ओलावा आवडतो; पण ओली माती नाही. जर तुमचे रोप कुंडीत लावले असेल, तर माती कधीही पूर्णपणे कोरडी होणार नाही याची खात्री करा. ओलावा राखल्याने मुळे सक्रिय राहतात आणि नवीन कोंब लवकर वाढण्यास मदत होते. म्हणून आवश्यकतेनुसार रोपाला पाणी द्या. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
द्रवरूपी खत महागड्या खतांऐवजी फळांच्या साली वापरा. केळी, संत्री व पपईच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस व जस्त यांसारखे घटक असतात, जे पानांची चमक आणि वनस्पतींची वाढ वाढवतात. या सालींचे लहान तुकडे करा आणि पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवा. त्यावर झाकण ठेवा आणि दोन-तीन दिवस सावलीत ठेवा. अधूनमधून ढवळत राहा. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश)
-
कढीपत्त्याची वाढ होईल १० दिवसांत
झोपल्यानंतर तुमच्याही तोंडातून लाळ गळते का? मग दुर्लक्ष करू नका; कारणे आणि उपाय समजून घ्या