-
पोट फुगलंय की चरबी वाढली आहे, अनेकदा यामधला फरक आपल्याला कळत नाही. मग जर समस्याच माहिती नसेल तर उपाय करूनही फायदा नाही. म्हणूनच दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर सुरंजित चॅटर्जी यांनी जनसत्ताला माहिती देताना सांगितले की, अनेकदा त्यांच्याकडे पोटफुगीचे रुग्ण येतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या पोटाची चरबी वाढली आहे आणि त्यामुळे मधुमेह, हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अलीकडेच डॉक्टरांकडे अशीच एक चिंता घेऊन एक रुग्ण आला. पण, तपासणी केल्यावर असे दिसून आले की, ही पोटाची चरबी नसून पोटफुगी आहे. पोटफुगी म्हणजे गॅस, द्रव जमा झाल्यामुळे पोटात तात्पुरती सूज येणे. अनेकांना हा फरक समजतसुद्धा नाही, म्हणून आज आपण पोटफुगी आणि पोटाची चरबी यातील फरक सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पोट फुगणे आणि बेली फॅटमधील फरक (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पोट फुगणे ही पचनसंस्थेत गॅस, हवा, द्रव जमा झाल्यामुळे होणारी तात्पुरती समस्या आहे. पोट अचानक घट्ट, जड किंवा कडक वाटते आणि अस्वस्थ वाटू लागते. वाटाणे, कोबी, ब्रोकोलीसारख्या गॅस निर्माण करणाऱ्या भाज्या, कोल्ड्रिंक्स किंवा दूध आणि ग्लूटेनसारख्या ॲलर्जी असणारे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणे ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या आयबीएस, बद्धकोष्ठता किंवा इतर आतड्यांसंबंधी समस्या असलेल्या लोकांमध्येदेखील दिसून येते. गॅस सोडल्यानंतर किंवा शौचालयाला जाऊन आल्यानंतर पोट फुगणे सामान्यतः कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याउलट पोटातील चरबी हळूहळू जमा होते आणि बराच काळ टिकते. जास्त कॅलरीजचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या उद्भवू शकते. पोटातील चरबी दोन स्वरूपात दिसते; त्वचेखाली जमा होणारी मऊ (सॉफ्ट) चरबी आणि अंतर्गत अवयवांभोवती जमा होणारी आतड्यांसंबंधित चरबी (विसरल फॅट), जी दिसत नाही. पण, आरोग्यासाठी अधिक धोकादायक असते आणि एकदा जमा झाला की खूप दिवस टिकून राहते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ब्लोटिंग आहे की पोटाची चरबी; कसं ओळखाल?
ब्लोटिंगमध्ये पोट फुगलेले दिसते. पण, चरबीसारखे ते चिमटा काढून पकडता येत नाही. असं करताना वेदना किंवा अस्वस्थतादेखील जाणवू शकते. दुसरीकडे, बेली फॅट मऊ असतो आणि तो चिमटा काढून सहज पकडता येतो. जर तुमचे पोट काही तरी खाल्ल्यानंतर बाहेर आले आणि काही तासांत किंवा दुसऱ्या दिवशी सामान्य स्थितीत आले तर तुमचे पोट फुगल्याची शक्यता जास्त आहे. पण, जर तुमचे पोट आठवडे किंवा महिन्यांत हळूहळू आकारात वाढले असेल आणि ते तसेच राहिले असेल तर ती पोटाची चरबी वाढली असण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: @Freepik) -
दोन्ही समस्यांवर उपाय काय?
पोट फुगणे टाळण्यासाठी…
१. रुग्णांनी त्यांचे अन्न हळूहळू चावून खावे.
२. जास्त प्रमाणात खाणे, भरपूर पाणी पिणे आणि गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळणे.
३. प्रोबायोटिक पदार्थ आणि नियमित आतड्याची हालचालदेखील उपयुक्त असतात; जर पोट फुगणे बराच काळ चालू राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik) -
पोटाची चरबी कमी करण्यासाठी…
१. जलद उपायांपेक्षा कायमस्वरूपी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.
२. संतुलित आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि ताण व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.
३. साखर, जंक फूड आणि अल्कोहोलचे सेवन कमी केल्यानेदेखील पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
