-
मेथी उगवण्यासाठी बाहेरून कोणतेही रोप आणण्याची गरज नाही, घरातील मेथीचे दाणे पुरेसे आहेत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
या दाण्यांना रात्रभर पाण्यात भिजवा, यामुळे त्यांना लवकर कोंब येतील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मेथीच्या लागवडीसाठी मोठी नाही तर सहा सात इंचाची एक कुंडी निवडा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
यात ५० टक्के सामान्य माती, ३० टक्के खत आणि २०% कोकोपीट वापरून मिश्रण तयार करा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मोड आलेल्या मेथीचे दाणे पसरवून त्यावर मातीचे आवरण लावा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
यावर हलक्या हाताने पाणी शिंपडा; पाणी साचले नाही पाहिजे याची काळजी घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
या कुंडीला दिवसभरात सहा ते सात तास तरी ऊन मिळाले पाहिजे याची काळजी घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
या बियांना तीन ते सात दिवसांमध्येच रोपं लागतील. थोडे मोठे व्हायला फार वेळ लागत नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
वीस ते तीस दिवसांत मेथी तयार होते व तुम्ही ती काढून खाऊसुद्धा शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मेथी तोडण्याकरिता तिला मुळापासून उपटू नये, फक्त वरील पाने काढा, त्यामुळे जे खालील मूळ आहे त्यांना पुन्हा पालवी फुटेल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
