-
उच्च रक्तदाब किंवा हायपर टेंशन हा एक ‘सायलेंट किलर’ आजार आहे; ज्यामध्ये धमन्यांमधील रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा जास्त असतो. उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. कारण – त्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा लक्षात येत नाहीत. पण, कालांतराने त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंडांचे नुकसान यासह अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० मिमी एचजी असतो. जेव्हा रक्तदाब १३०/८० मिमी एचजीपेक्षा जास्त असतो. तेव्हा उच्च रक्तदाब मानला जातो. उच्च रक्तदाब होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात; ज्यामध्ये जास्त मीठ, जंक फूडचे सेवन, लठ्ठपणा, ताण, शारीरिक हालचालींचा अभाव, आनुवंशिक घटक यांचा समावेश असतो. दीर्घकाळापर्यंत सतत उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, हृदयाचे ठोके अचानक वाढणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
उच्च रक्तदाबासारख्या दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, नियमित चालणे, योगासने, मीठाचे सेवन कमी करणे, फायबर, पोटॅशियमयुक्त आहार घेणे, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ओट्सचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ताण कमी होऊन रक्तदाब सामान्य होतो. आयुर्वेदात रक्तदाब सामान्य करण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी काही घरगुती उपायदेखील सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
आयुर्वेद, योग व नसर्गोपचार डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले आध्यात्मिक गुरू आचार्य मनीष जी यांनी रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी एक विशेष रस पिण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, जर तुमचा रक्तदाब जास्त राहिला, तर ‘या’ पाच पानांचा रस बनवा आणि संध्याकाळी ५ वाजता प्या. १५ दिवसांत तुमचा रक्तदाब सामान्य होईल. पालक, मेथीची पाने, कोथिंबिरीची पाने, कढीपत्ता, मुळा या पाच पानांचा रस काढून, तो दररोज प्यायल्याने औषधाशिवाय रक्तदाब सामान्य होतो. चला जाणून घेऊया कोणत्या पालेभाजीची पाने कशा प्रकारे रक्तदाब नियंत्रित करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पालक – पालकाच्या रसामध्ये पोटॅशियम, नायट्रेट, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात; जे रक्तवाहिन्यांना आराम देतात, नैसर्गिकरीत्या उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. पालकाच्या रसातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदयाचे रक्षण करून हृदयावरील ताण कमी करतात. तसेच धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्याससुद्धा मदत करतात.
मेथी – मेथीच्या पानांचा रस शरीरातून सोडियम काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये असलेले पोटॅशियम, फायबर हृदयाचे कार्य सुधारते. मेथीच्या पानांचा रस शरीरातील जळजळ कमी करतो आणि धमन्या स्वच्छ ठेवून रक्तदाब सामान्य करतो. (फोटो सौजन्य: @Freepik) -
कोथिंबिरीची पाने – कोथिंबिर हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी, सोडियम काढून टाकण्यास मदत करतात. कोथिंबिरीची पाने लघवीचे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढवण्याचे काम करतात, रक्तदाब लवकर नियंत्रित करतात आणि त्यातील फ्लेवोनॉइड्स हृदयाला बळकटी देऊन ताण कमी करण्यास मदत करतात.
कढीपत्ता – कढीपत्त्याच्या पानांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तवाहिन्या कडक होत नाहीत, हृदयाची पंपिंग सिस्टीम सुधारतात. कढीपत्त्याचा रस रक्तातील साखर, रक्तदाब दोन्ही नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थदेखील बाहेर पडतात. (फोटो सौजन्य: @Freepik) -
मुळा – मुळ्याच्या पानांमध्ये नायट्रेट्स असतात; जे रक्तवाहिन्या रुंद करून रक्तप्रवाह सुधारतात. त्यामुळे उच्च रक्तदाब लवकर कमी होण्यास मदत होते. मुळ्याच्या पानांचा रस जळजळ कमी करतो, मूत्रपिंड स्वच्छ करतो आणि हृदयाला निरोगी ठेवतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पालक, मेथी, कोथिंबीर, कढीपत्ता, मुळा या पानांचा रस कसा बनवायचा?
साहित्य – १ कप पालकाची पाने, १/२ कप मेथीची पाने, १/२ कप कोथिंबिरीची पाने, १०-१२ कढीपत्ता, १ कप मुळ्याची पाने, १ छोटा तुकडा आल्याचा (पर्यायी), १ चमचा लिंबाचा रस, १ ग्लास पाणी किंवा नारळ-पाणी. (फोटो सौजन्य: @Freepik) -
कृती
सगळ्या भाज्यांची पाने पूर्णपणे धुऊन स्वच्छ करून घ्या. मिक्सरमध्ये ती बारीक करून घ्या आणि पाणी किंवा नारळ-पाणी त्यात घाला. हवे असल्यास, चव आणि दाहकविरोधी फायद्यांसाठी आलेसुद्धा घालू शकता. सर्व काही मिक्स करून जाड रस तयार करा. रस एका ग्लासमध्ये गाळा. चव वाढविण्यासाठी लिंबाचा रस घाला आणि लगेच प्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
