-
दूध केवळ आरोग्याची काळजी घेत नाही, तर शरीराला आवश्यक असलेली मजबुती आणि ऊर्जा (Energy)देखील प्रदान करते. ते एक परिपूर्ण अन्न मानले जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हाडांची मजबुती
दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन व व्हिटॅमिन डी असते. हे घटक हाडांना आतून मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
बद्धकोष्ठतेचा त्रास
अनेकांना सकाळी दूध पिण्याची सवय असते; मात्र रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास उदभवू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पोटाच्या तक्रारी
ज्यांना आधीपासूनच पोटाशी संबंधित समस्या किंवा पचनशक्तीच्या तक्रारी आहेत, त्यांनी रिकाम्या पोटी दुधाचे सेवन करणे टाळावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
लॅक्टोज इनटॉलरन्स
ज्या व्यक्तींना ‘लॅक्टोज इनटॉलरन्स’चा त्रास आहे, त्यांनी रिकाम्या पोटी दूध अजिबात पिऊ नये; अन्यथा पोटाचे विकार वाढू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वजन कमी करण्यासाठी
जर तुम्ही वजन कमी करण्याचा (Weight Loss) प्रयत्न करीत असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ॲसिडीटीची समस्या
सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात ॲसिडची निर्मिती वाढू शकते, ज्यामुळे जळजळ किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
