-
योग्य काळजी न घेतल्यास तुळस कोमेजू लागते. दररोज पाणी देऊनही तुळशीचे झाड का सुकते, असे प्रश्न अनेकांना पडतात. त्यामुळे काही उपाय…( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
हिवळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी? ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
हिवाळ्यात तुळशीच्या झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण- जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात आणि बुरशीची लागण होऊ शकते. दवामुळे पाने सुकतात, काळी पडतात आणि गळतातही. कीटकदेखील रोपावर हल्ला करू शकतात. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
तुळशीच्या झाडावर थेट दव पडू देऊ नये. त्यासाठी कुंडी सावलीत ठेवावी लागेल. जर कुंडीत रोप लावले नसेल, आणि जागा बदलणे शक्य नसेल, तर ती कापडाने झाकून टाका. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
कोणते खत वापरावे? तुम्ही कोणतेही खत वापरले तरी ते महिन्यातून एकदा वापरणे पुरेसे आहे. तुम्ही शेणखत वापरू शकता. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
पाणी किती द्यावे? हिवाळ्यात तुळशीच्या झाडांना जास्त पाणी देऊ नये. पाणी देण्यापूर्वी माती तपासा. जर माती दोन इंचांच्या आत कोरडी असेल, तरच पाणी द्या. जास्त पाणी दिल्याने झाडाची मुळे कुजतात आणि बुरशीजन्य वाढीचा धोका वाढतो. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
हळदीचा वापर करा हळद ही एक अँटीबायोटिक आहे. तुळशीसाठी ती वापरल्यास फायदेशीर मानली जाते. एक चमचा हळद तुळशीच्या आजूबाजूला पसरवा. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
-
कळ्या काढाव्यात का? तुळशीच्या झाडाला हिरव्या कळ्या असतील, तर त्या काढू नयेत. तथापि, जर कळ्या सुकल्या असतील आणि त्या तपकिरी झाल्या असतील, तर त्या ताबडतोब काढून टाकाव्यात. असे केल्याने तुळशीच्या झाडाचे बुरशीपासून संरक्षण होईल. ( फोटो स्रोत : अनस्प्लॅश )
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातील प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी हात जोडले
