-
नाभासाठी सामान्यतः नारळ किंवा मोहरीचे तेल वापरले जाते; परंतु ऑलिव्ह ऑइल नियमितपणे नाभीवर लावल्यास त्याचे आरोग्य आणि त्वचेसाठी अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नाभीला तेल लावण्याचे ५ फायदे पचन सुधारते : जर तुम्हाला वारंवार पोटदुखी, गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर ऑलिव्ह ऑइल तुम्हाला मदत करू शकते. झोपण्यापूर्वी नाभीवर ऑलिव्ह ऑइलचे दोन थेंब लावल्याने आणि त्या भागाला हलक्या हाताने मालिश केल्याने आतड्यांची हालचाल चांगली होते. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि निरोगी पचनसंस्थेला चालना मिळण्यास मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्वचेची चमक आणि सौंदर्यवाढीस उपयुक्त : कोरडी त्वचा ही अनेक लोकांसाठी एक सामान्य समस्या आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. नाभीवर ऑलिव्ह ऑइल लावल्याने त्वचा आतून हायड्रेट होते, ज्यामुळे तिला नैसर्गिक चमक मिळते. ही बाब सुरकुत्या कमी करण्यास, त्वचा मऊ करण्यास मदत करते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
सांधेदुखीपासून आराम : वयानुसार किंवा शारीरिक ताणामुळे सांधेदुखी वाढते. ऑलिव्ह ऑइलमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकतात. नाभीला ऑलिव्ह ऑइल नियमित लावल्याने हाडे व सांधे चांगले कार्य करतात आणि शरीरातील वेदना कमी होतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मानसिक शांततेत वाढ आणि ताणात घट: नाभीवर तेल मालिश केल्याने मज्जासंस्था शांत होण्यास मदत मिळते, असे मानले जाते. दिवसभरात जमा होणारा शारीरिक आणि मानसिक ताण कमी होण्यास, चांगली झोप येण्यास आणि तणावाशी संबंधित डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर: मासिक पाळीदरम्यान तीव्र पोटदुखी कमी करण्यास ऑलिव्ह ऑइल मदत करते. ते नाभीवर लावल्याने गर्भाशयाच्या स्नायूंना आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नाभीवर ऑलिव्ह ऑइल कसे वापरावे? झोपण्यापूर्वी तुमची नाभी पूर्णपणे स्वच्छ करा. नाभीत शुद्ध ऑलिव्ह ऑइलचे दोन ते तीन थेंब टाका. तुमच्या बोटाने नाभीभोवती गोलाकार हालचालीत सुमारे पाच मिनिटे हळुवारपणे मालिश करा. रात्रभर ते तेल तसेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुऊन टाका. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
