-
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते.
-
जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते. या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. -
पंचांगानुसार, ३ फेब्रुवारी २०२६ बुध कुंभ राशीत प्रवेश करतील. तर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र देखील याच राशीत प्रवेश करेल. या दोन्ही ग्रहांचे गोचर या वर्षातील सर्वात मोठे गोचर असेल. -
फेब्रुवारीत लक्ष्मी-नारायण योग जवळपास ३० दिवस सक्रिय राहील. २ मार्च रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल. तेव्हा हा योग समाप्त होईल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे “लक्ष्मी-नारायण योग” निर्माण होतो. हा योग खूप प्रभावी मानला जातो.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल.
-
हा योग सिंह राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
