-
ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो.
-
नुकताच २०२६ मधील पहिला जानेवारी महिना संपला असून हिंदू पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरू आहे.
-
पंचांगानुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याला सुरुवात होईल, हा महिना कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा चांगल्या कामाच्या सुरूवातीसाठी अत्यंत खास मानला जातो.
-
हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील.
-
कर्क राशींच्या व्यक्तींसाठीही फाल्गुन महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.
-
धनु राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील.
-
मीन राशीच्या लोकांना या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
