-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला सौंदर्य, आकर्षण, प्रेम, धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा कुंडलीतील शुक्र मजबूत असतो तेव्हा नक्कीच अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात.
-
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ०२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजून ०१ मिनिटांनी शुक्र शनीच्या कुंभ राशीतून गुरूच्या मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
-
या दिवशी होळी पौर्णिमादेखील आहे त्यामुळे हे गोचर खूपच खास ठरेल. शुक्र ग्रहाचे हे राशी परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल. -
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गुरूच्या मीन राशीतील राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे मीन राशीतील गोचर अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
-
शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. -
मीन राशीमध्येच शुक्राचे गोचर होणार असून मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
