-
आजच्या धकाधकीच्या जीवनात रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी अनेक जण चहाचा आधार घेतात. मात्र, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी एक ‘सायलेंट किलर’ ठरू शकते.
-
चहाच्या अतिसेवनामुळे केवळ झोपच उडत नाही, तर मानसिक तणावापासून ते आतड्यांच्या गंभीर आजारांपर्यंत अनेक समस्या उदभवू शकतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
-
झोपेचा विकार
रात्री जागण्यासाठी चहाचा वारंवार वापर केल्यास नैसर्गिक झोपेचे चक्र पूर्णपणे विस्कळित होऊन आरोग्यावर वाईट परिणाम होतो. -
मानसिक आरोग्य
झोप पूर्ण न झाल्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि एंग्जाइटी किंवा सतत अस्वस्थ वाटण्यासारख्या गंभीर समस्या उदभवतात. -
अॅसिडीटीचा त्रास
चहामुळे पोटातील आम्लाचे उत्पादन वाढते, ज्यामुळे छातीत सतत जळजळ होणे आणि अस्वस्थता जाणवण्याचा त्रास होतो. -
पचनात बिघाड
चहाचे अतिसेवन पचन प्रक्रियेत अडथळे निर्माण करते, ज्यामुळे गॅसेस आणि पोटाच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होते. -
आतड्यांचे नुकसान
वारंवार चहा पिण्यामुळे आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन, तब्येत कायमस्वरूपी खराब होण्याचा धोका असतो. -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तेव्हा कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
