-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: AI)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राला भौतिक सुख, आकर्षण, प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह राशी परिवर्तनासह शुक्र नक्षत्र गोचर, नक्षत्र पद गोचर, वक्री आणि अस्त, उदय देखील होतो. एका राशीत शुक्र तब्बल २६ दिवस वास करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सध्या शुक्र मकर राशीत अस्त अवस्थेत विराजमान असून तो ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी उदय स्थितीत आला, ज्याचा १२ पैकी काही राशींच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या मकर राशीमध्ये शुक्र ग्रहासह बुध, सूर्य आणि मंगळ देखील विराजमान आहेत. शिवाय ५३ दिवस अस्त स्थितीत असलेल्या शुक्राचा प्रभाव उदय स्थितीत येताच अत्यंत प्रभावी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची उदय स्थिती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची उदय स्थिती शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राची उदय स्थिती मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची उदय स्थिती अनुकूल ठरेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात व्यवसायात चांगली प्रगती होईल. कल्पनाशक्ती प्रबळ राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
