-
अनेकदा महागडे स्किन प्रॉडक्ट वापरूनही त्वचा उजळण्यासाठी फारसा फरक पडत नाही. त्यात क्रीमचा दोष आहे की त्वचेचा हे कळत नाही म्हणून ही माहिती तुमच्या फायद्याची ठरेल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
भरपूर प्रॉडक्ट वापरणे कधी कधी त्वचेवर अनेक प्रॉडक्ट्स वापरल्याने मुरमे येतात. त्वचा सर्व प्रकारच्या क्रीमचे शोषण करू शकत नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नियमित नसणे त्वचेला काही गोष्टींचा प्रभाव पडायला वेळ लागतो. त्यामुळे एखादे क्रीम नियमित वापरावे. अनियमिततेमुळे त्वचा चांगला प्रभाव देत नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्वचेच्या गुणवत्तेनुसार योग्य उत्पादन न वापरणे प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक त्वचेला वेगळे क्रीम लागते. चुकीचे क्रीम वापरल्याने चेहऱ्यावर मुरमे येतात किंवा अॅलर्जी होऊ शकते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मेकअप न काढता झोपणे मेकअप ठेवून झोपल्यास त्वचेव मुरमे येऊ शकतात. नेहमीच चेहरा स्वच्छ धुऊन झोपावे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
सनक्रीम न वापरणे सूर्यकिरणांच्या तीव्रतेमुळे त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे सनस्क्रीम वापरावे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
अनेक क्रीम एकत्र वापरणे काही जण मॉइश्चरायझर, सनस्क्रीम, लोशन एकत्र लावतात आणि त्वचेची गुणवत्ता बिघडवतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
अयोग्य आहार आणि कमी पाणी पिणे तेलकट खाणे किंवा पाणी कमी प्यायल्याने त्वचेचा पोत बिघडतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
