-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.
-
पंचांगानुसार, ०३ मार्च २०२६ रोजी मंगळ राहू ग्रहाच्या शततारका नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाचे हे नक्षत्र गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या नक्षत्र गोचराच्या प्रभावाने काही राशींच्या लोकांचा भाग्योदय होईल.
-
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल.
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.
-
मंगळाचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे नक्षत्र परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: फोटो सौजन्य)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
