-
कॉफी हे एक आवडते पेय आहे, दिवसभराच्या थकव्यामुळे आराम मिळवण्यासाठी हे पेय मदतही करते ते त्याच्या उत्तम ऊर्जावान प्रभावांसाठी घराघरात लोकप्रिय झाले आहे. परंतु, असे काही लोक आहेत, ज्यांच्यासाठी कॉफी योग्य असू शकत नाही. ( फोटो स्रोत : फ्रीपिक )
-
कारण- ती काही आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते किंवा ती त्या समस्या आणखी बिघडवू शकते. या चिंता समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून एक कप कॉफीचा आनंद घेणे तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरणार नाही. ( फोटो स्रोत : फ्रीपिक )
-
असुरक्षित गटांनी ते मर्यादित करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ऊर्जादायी ठरणारा हा कप आधीच अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या वाढवू नये आणि त्यामुळे अनपेक्षित गुंतागुंत निर्माण होऊ नये. ( फोटो स्रोत : फ्रीपिक )
-
१. चिंता वाढते पोषणतज्ज्ञांनी असा इशारा दिला की, कॉफी हे एक उत्तेजक पेय आहे, जे धडधड वाढवू शकते, जे एक चिंतेचे कारण असल्यामुळे तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवते. कॅफिन शरीर आणि मनाला चालना देते, मज्जासंस्थेवर परिणाम करते, तुम्ही आधीच चिंताग्रस्त असाल, तर कॉफी तुमची चिंता आणखी वाढवेल.( फोटो स्रोत : फ्रीपिक )
-
२. आम्लता वाढते जर तुमचे पोट वारंवार बिघडत असेल किंवा तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर पोषणतज्ज्ञांनी कॉफी पिण्याविरुद्ध इशारा दिला. “त्यामुळे तुमचा अॅसिड रिफ्लक्स वाढू शकतो आणि तुम्हाला खूप वाईट वाटू शकते, कॉफी प्यायल्याने संवेदनशील आतडे आणखी खराब होऊ शकते. त्यामुळे अन्न आरामात पचणे कठीण होते. आतडे हे आतडे-मेंदू अक्ष, आतडे-त्वचा दुवा आणि रोगप्रतिकारक शक्ती यांसारख्या प्रमुख शारीरिक आणि मानसिक प्रणालींशी जोडलेले असल्याने, तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ( फोटो स्रोत : फ्रीपिक )
-
३. गर्भधारणा असेल तर कमी कॉफी प्या कॅफिन गर्भाच्या वाढीवर किंवा बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते. पोषणतज्ज्ञांनी इशारा दिला की, कृपया कॉफीचे सेवन मर्यादित करा किंवा कमी करा. कारण- याचा परिणाम बाळाच्या किंवा गर्भाच्या विकासावर होणार आहे. कमी जन्म वजन, हृदय आणि जननेंद्रियातील विसंगती, जास्त शरीराचे वजन आणि न्यूरोडेव्हलपमेंटल आणि न्यूरोबैव्हेरियल परिणाम असे परिणाम बाळावर होऊ शकतात. ( फोटो स्रोत : फ्रीपिक )
-
४. उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार जे उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही आजाराने ग्रस्त आहे त्यांना पोषणतज्ज्ञांनी कॉफी टाळण्याचा इशारा दिला आहे. “कॉफी तुमचा रक्तदाब आणखी वाढवू शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि लक्षणे आणखी गंभीर होऊ शकतात,” एका अभ्यासात असे आढळून आले की, कॅफिनमुळे अॅड्रेनालाईन बाहेर पडते, ज्यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात आणि रक्तदाब वाढतो. ( फोटो स्रोत : फ्रीपिक )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
