-
home remedies for black underarms : अनेक मुली आणि महिलांना स्लीव्हलेस कपडे घालण्यास किवा गर्दीत हात वर करण्यास लाज वाटते. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या काळ्या काखा (अंडरआर्म्स) आणि त्यामधून येणारा दुर्गंध. तसे दिसणे केवळ वाईट दिसतेच, असे नाही, तर त्यामुळे लोकांच्या नकारात्मक नजरांमुळे एखाद्याचा आत्मविश्वासदेखील कमी होऊ शकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
वारंवार शेव्हिंग करणे, जास्त घाम येणे, घट्ट कपडे घालणे, स्वच्छतेचा अभाव व रासायनिक क्रीम वापरणे यांमुळे काखां काळे होण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. कधी कधी ही समस्या हार्मोनल बदलांमुळेदेखील उद्भवू शकते. त्याच वेळी काही लोकांच्या काखांमध्ये असलेल्या एपोक्राइन ग्रंथी जास्त घाम निर्माण करतात. जेव्हा हा घाम जीवाणूंच्या संपर्कात येतो तेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय साहीत्य बेकिंग सोडा – १ टीस्पून कॉफी पावडर – १ टीस्पून कोलगेट – १ टीस्पून टोमॅटो प्युरी – १ लहान वाटी लिंबाचा रस – ३ टीस्पून ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कृती प्रथम एक वाटी घ्या. त्यात बेकिंग सोडा, कॉफी पावडर, कोलगेट, टोमॅटोचा रस व लिंबाचा रस घाला. सर्व काही नीट मिसळा. ही पेस्ट तुमच्या काखांमधील काळ्या भागांवर लावा. ते कोरडे होऊ द्या. नंतर तुमच्या काखा धुऊन टाका. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बटाट्याचा रसः काखांचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा वापरा. तो कापून थेट काखेवर घासा किंवा त्याचा रस लावा. बटाट्याचा रस नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
दुर्गंधी दूर करण्याचा सोपा उपाय काखांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबाचे काही थेंब मिसळा. मग ते मिश्रण काखांमधील काळ्या भागावर लावा. त्यामुळे तेथील जीवाणू नष्ट होतील आणि त्वचा ताजीतवानी होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
