-
ज्योतिषशास्त्रामध्ये केतूला क्रुर ग्रह आणि छाया ग्रह मानले जाते. केतू ग्रह दीड वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. पण अनेकदा या दरम्यान तो नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तनही करतो.
-
सध्या केतू सिंह राशीत विराजमान असून याच राशीत चंद्राचे गोचर होईल ज्यामुळे चंद्र-केतूची युती निर्माण होईल.
-
चंद्र-केतूची युती ग्रहण दोष निर्माण करते. ज्यामुळे व्यक्तीच्या मानसिकतेवर, आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवरही गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतो.
-
पंचांगानुसार, चंद्र ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासून विराजमान असलेला केतू ग्रहण योग निर्माण करेल.
-
या दोषाचा १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर आधी प्रभाव पाहायला मिळेल.
-
सिंह राशीच्या लोकांवर खोलवर परिणाम होईल. या काळात तुम्हाला मानसिक अशांतता आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात समस्या उद्भवू शकतात. उत्पन्नात अचानक घट होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असेल.
-
सिंह राशीत चंद्राचे गोचराचा तूळ राशीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा ग्रहण योग तुमच्या कामात अडथळे आणू शकतो आणि नवीन जबाबदाऱ्यांचा सामना करण्याचा हा काळ असू शकतो. तुम्हाला असे वाटेल की तुमच्या प्रयत्नांना न जुमानता यश तुमच्यापासून दूर जात आहे.
-
चंद्र-केतूचा ग्रहण योग मकर राशीच्या लोकांसाठी विशेषतः आव्हानात्मक असू शकतात. या काळामध्ये तुमच्या जीवनात बदल होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन संधी येऊ शकतात, परंतु तुम्हाला अनेक जोखीम पत्करावी लागतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
