-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर राहूला मायावी ग्रह म्हटले जाते.
-
राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते.
-
तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, सध्या राहू कुंभ राशीत विराजमान असून फेब्रुवारीत शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
-
पंचांगानुसार, ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन रात्री ०१ वाजून १५ मिनिटांनी होईल. या राशीत आधीपासूनच राहू उपस्थित असल्याने या राशीत शुक्र आणि राहूची युती निर्माण होईल. ही युती नक्कीच काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी ही युती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
