-
जेवणात दुप्पट मीठ टाकले जाते तेव्हा भाजीची चव पूर्णपणे खराब होते. स्वयंपाकाची आवड असलेले लोक साधारणपणे सहज अंदाज लावून मीठ, मिरची, मसाले घालतात. त्यानंतरही ही चूक अनेक वेळा होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या भाजीत, डाळ, ग्रेव्ही किंवा कोणत्याही अन्नपदार्थात जास्त मीठ असेल, तर त्याची चव संतुलित करण्यासाठी तुम्ही गरजेनुसार खालील ५ पदार्थांपैकी कोणतीही गोष्ट घालू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
भाजीत दही घाला तुमच्या भाज्यांमधील मीठ कमी करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. भाजीत एक ते दोन चमचे दही घाला आणि चांगले मिसळा. त्यामुळे मीठ संतुलित होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बेसनाचा वापर करा जेव्हा जास्त मीठ असेल तेव्हा ते संतुलित करण्यासाठी बेसन वापरा. तुम्ही भाजलेले बेसनदेखील घालू शकता. हे करण्यासाठी प्रथम बेसन एका तव्यावर कोरडे भाजून घ्या. नंतर ते ग्रेव्हीमध्ये घाला आणि भाजी थोडा वेळ उकळवा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जर तुम्ही ग्रेव्ही किंवा डिश बनवत असाल, तर खारटपणा संतुलित करण्यासाठी तुम्ही ब्रेड वापरू शकता. जर ग्रेव्ही कमी शिजलेली वाटत असेल, तर थोडे गरम पाणी घाला. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पिठाचा गोळा जर तुम्ही डाळ किवा ग्रेव्ही बनवली असेल आणि ती खूप खारट असेल, तर तुम्ही त्यात पिठाचा गोळा टाकू शकता सर्व्ह करण्यापूर्वी हा गोळा काढा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
उकडलेले बटाटे उकडलेले बटाटे वापरून तुम्ही तुमच्या भाज्यांमधील मीठ कमी करू शकता. उकडलेले बटाटे मॅश करा आणि जास्त मीठ असलेल्या भाजीत ते पूर्णपणे मिसळा. त्यामुळे खारटपणा कमी होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
