-
लोक बऱ्याचदा भाज्यांची साले फेकून देतात. कारण- त्यांना वाटते की, ती निरुपयोगी आहेत; पण प्रत्यक्षात ती खूप उपयुक्त असतात. ज्याप्रमाणे भाज्यांची साले बागकामासाठी कंपोस्ट बनवण्यासाठी वापरली जातात, त्याचप्रमाणे रताळ्याची सालेदेखील उपयुक्त आहेत. ती फेकून देणे ही एक चूक असू शकते. कारण- तुम्ही त्यांचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये करू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
रताळ्याची साल केवळ खाण्यायोग्य असण्याबरोबरच ती लगद्यापेक्षाही अधिक पौष्टिक असते. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई व बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही तुमच्या आहारात अतिरिक्त पोषण जोडू इच्छित असाल, तर रताळ्याची साल वापरण्याचे सहा मार्ग आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहेत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कुरकुरीत आरोग्यदायी चिप्स जर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत अशा वेगळ्या पदार्थाचा शोध घेत असाल, तर रताळ्याच्या चिप्स हा एक उत्तम पर्याय आहे. साले कापून घ्या, त्यावर थोडे ऑलिव्ह ऑइल, मीठ, मिरपूड व चाट मसाला शिंपडा. मग ती एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये १८०°C वर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. हा तुमच्यासाठी एक आरोग्यदायी आणि फायबरयुक्त नाश्ता ठरू शकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पिठाची पौष्टिकता वाढविणारी सालींची पावडर पावडर बनवण्यासाठी आणि साठवण्यासाठी साले नीट धुऊन घ्या आणि उन्हात वाळवा. ती घट्ट झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवा. ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. आता जेव्हा तुम्ही रोटी, पराठा किंवा चिल्लासाठी पीठ बनवाल तेव्हा दोन-तीन चमचे ही पावडर घाला. त्यामुळे पिठाचे पौष्टिक मूल्य तर वाढेलच; पण रोट्यांना गोड चव आणि चांगली पोतदेखील मिळेल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पराठ्यांसाठी पौष्टिक सारण रताळ्याची साले फेकून देण्याऐवजी ती बारीक किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले व कोथिंबीर घाला. हे मिश्रण पराठ्यांमध्ये सारण भरण्यासाठी उपयुक्त ठरते. एकदा शिजल्यानंतर साले मऊ आणि स्वादिष्ट होतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
घट्ट व चविष्ट ग्रेव्ही, सूपसाठी फायदेशीर पेस्ट कॉर्नफ्लोअर किंवा क्रीमचा वापर ग्रेव्हीज घट्ट करण्यासाठी केला जातो. त्याऐवजी उकडलेल्या रताळ्याच्या साली बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट डाळ, भाज्यांच्या ग्रेव्ही किंवा सूपमध्ये घाला. त्यामुळे तुमच्या डिशला समृद्ध व मलईदार पोत मिळेल, तसेच चवीला थोडासा नैसर्गिक गोडवादेखील येईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
चव, रंगासह आरोग्यदायी सूपसाठी… भाज्यांचा साठा बनवताना रताळ्याची साले घातल्याने त्याची चव आणि रंग दोन्ही वाढतात. सालांमधील खनिजे पाण्यात विरघळतात, ज्यामुळे ते आणखी आरोग्यदायी बनते. तुम्ही ते कोणत्याही सूपमध्ये उकळून नंतर मॅश करू शकता, ज्यामुळे सूपमधील फायबरचे प्रमाण वाढते आणि ते खूप हलके आणि पचण्यास सोपे होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
भाजलेले गार्निशिंग्ज आणि सॅलड टॉपिंग्ज रताळ्याचे गोल तुकडे करा. नंतर त्यांना सालासह थोडे बटर लावा आणि ते भाजून घ्या. भाजल्यानंतर, साल थोडीशी कॅरमेलाइज्ड व कुरकुरीत होते. मग त्यांचे लहान तुकडे करा आणि ते तुमच्या सॅलड किंवा पास्तामध्ये सजवण्यासाठी वापरा. त्यामुळे साध्या सॅलडला एक प्रीमियम आणि सौंदर्यादायी लूक मिळेल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
