-
संत्रे
संत्रे हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत मानले जाते. १०० ग्रॅम संत्र्यामध्ये सुमारे ५३.२ मिग्रॅ व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ब्रोकोली
१०० ग्रॅम ब्रोकोलीमध्ये सुमारे ८९.२ मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते. यासोबतच फायबर, प्रथिने आणि पोटॅशियमही भरपूर मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ढोबळी मिरची
ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. एक ढोबळी मिरची शरीराच्या दैनंदिन गरजेच्या सुमारे १६९ टक्के व्हिटॅमिन सी पुरवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
केल (Kale)
केल या पालेभाजीमध्ये १०० ग्रॅममध्ये सुमारे १२० मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि फोलेटही मुबलक असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हे फळ व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. एक कप स्ट्रॉबेरीत सुमारे ९० मिग्रॅ व्हिटॅमिन सी मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
टोमॅटो
टोमॅटोमध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. एक मध्यम आकाराचा टोमॅटो शरीराच्या सुमारे २८ टक्के दैनंदिन व्हिटॅमिन सीची गरज पूर्ण करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
व्हिटॅमिन सीचे फायदे
व्हिटॅमिन सीमुळे पेशी निरोगी राहतात, त्वचा व हाडांचे आरोग्य सुधारते आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
व्हिटॅमिन सीची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास स्कर्व्ही हा आजार होऊ शकतो, असा इशारा आरोग्यतज्ज्ञ देतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
(टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
“सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर…”, हसन मुश्रीफ यांचं महत्त्वाचं विधान
