-
अनेकदा महिलांना लवकर थकवा येतो किंवा त्यांना जास्त झोप लागते, असे ऐकायला मिळते. काही लोक ही बाब आळस किंवा कमजोरीशी जोडतात. मात्र, विज्ञान यामागे काही वेगळीच कारणे असल्याचे सांगते. संशोधनानुसार महिलांना जैविक दृष्ट्या पुरुषांपेक्षा अधिक झोपेची गरज असते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
महिलांचा मेंदू अधिक काम का करतो?
वैज्ञानिकांच्या मते, महिलांचा मेंदू एकाच वेळी अनेक कामे करताना अधिक सक्रिय राहतो. २०१६ मध्ये Chronobiology International या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
या संशोधनानुसार दैनंदिन आयुष्यातील नियोजन, भावना नियंत्रण, संवाद व निर्णय प्रक्रिया करताना महिलांच्या मेंदूचे अधिक भाग एकाच वेळी कार्यरत असतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
वाढलेला मानसिक ताण
घर, काम, नाती व भावनिक जबाबदाऱ्या अशा अनेक भूमिका महिलांना एकाच वेळी पार पाडाव्या लागतात. त्यामुळे त्यांची मानसिक ऊर्जा सातत्याने खर्च होते, जी झोपेमुळे भरून निघते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
हार्मोन्समधील बदल
मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीच्या काळात होणारे हार्मोनल बदल झोपेवर परिणाम करतात. काही हार्मोन्स झोप येण्यास मदत करतात; पण झोप वारंवार खंडित होण्यालाही ते कारण ठरतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
झोपेच्या रचनेतील फरक
महिलांना साधारणतः खोल झोप जास्त प्रमाणात मिळते. मात्र, वारंवार जाग येत असल्याने झोप पूर्णपणे ताजेतवाने करणारी वाटत नाही. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
झोपेच्या विकारांचा धोका
संशोधनानुसार महिलांमध्ये अनिद्रा आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमसारख्या झोपेशी संबंधित समस्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आढळतात. त्यामुळे थकवा कायम राहतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
महिलांना किती झोप आवश्यक?
अभ्यासानुसार महिलांना पुरुषांपेक्षा सरासरी १५ ते २० मिनिटे अधिक झोपेची गरज असते. मात्र, ही गरज प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
जास्त झोप म्हणजे कमजोरी?
मुळीच नाही. ही कोणतीही कमजोरी नसून, जैविक फरकाचा तो परिणाम आहे. ही बाब समजून घेऊन महिलांच्या झोपेच्या आणि आरोग्याच्या गरजांकडे अधिक समजूतदारपणे पाहणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समिती निकाल जाहीर; कुणी मारली बाजी, कुणाचा झाला पराभव?
