-
तमिळनाडू, विशेषतः चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांत बर्ड फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक मांस खरेदी करण्याबाबत साशंक झाले आहेत. जे मांस घेत आहेत, त्यांनाही ते सुरक्षितरीत्या कसे स्वच्छ करावे, याबाबत संभ्रम आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
फक्त पाण्याने धुणे पुरेसे नाही
पूर्वी कोंबडीचे मांस नळाखाली धुणे पुरेसे मानले जात होते. मात्र तज्ज्ञांच्या मते, साधे पाणी फक्त दिसणारे रक्त आणि चरबी काढते; पण घातक जंतू नष्ट करू शकत नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पॅकेज्ड चिकनमधील धोका
पॅकेज्ड कच्च्या चिकनमध्ये सॅल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टरसारखे जीवाणू वाढण्याची शक्यता अधिक असते. हे जीवाणू फक्त पाण्याने धुतल्याने नष्ट होत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
गंभीर आजारांचा धोका
सॅल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर संसर्गामुळे ताप, उलटी, मळमळ, जुलाब आणि क्वचित प्रसंगी रक्तसंसर्ग होऊ शकतो. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पॅकेजिंग काळजीपूर्वक काढा
चिकनचे पॅकेजिंग काढताना विशेष काळजी घ्यावी. पॅकिंगमधून जीवाणू पसरू शकतात. चिकन स्वच्छ भांड्यात काढून, स्वच्छ फळ्यावर ठेवून कागदी टिश्यूने माती किंवा घाण पुसावी. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
गरम पाणी आणि हळद वापरा
चिकन पुसल्यानंतर गरम पाण्यात हळद मिसळून ते नीट धुवावे. हळदीत जंतुनाशक गुणधर्म असल्याचा पारंपरिक समज आहे आणि त्यामुळे स्वच्छतेस मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
व्हिनेगर आणि लिंबाचा उपाय
व्हिनेगर आणि लिंबाचा रस हे नैसर्गिक निर्जंतुक घटक मानले जातात. या द्रावणात चिकन १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवावे. त्यामुळे दुर्गंधी कमी होते आणि जंतू कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
मिठाच्या पाण्यात भिजवणे
थंड पाण्यात एक ते दोन चमचे मीठ मिसळून, त्यात चिकन १० ते १५ मिनिटे भिजवावे. मीठ पृष्ठभागावरील जंतू आणि घाण काढण्यास मदत करते. नंतर थंड पाण्याने धुवावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
स्वच्छता आणि स्वयंपाकघराची काळजी
चिकन हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने धुणे अत्यंत आवश्यक आहे. वापरलेली सुरी, फळी आणि भांडी स्वच्छ करून स्वयंपाकघरातील पृष्ठभाग निर्जंतुक ठेवावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समिती निकाल जाहीर; कुणी मारली बाजी, कुणाचा झाला पराभव?
