-
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) सध्या आपल्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नम्रताने नुकतंच शेतात एक फोटोशूट केले आहे.
-
नम्रताची ही अस्सल गावरान स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
नम्रताने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
“हातात कष्ट आणि चेहऱ्यावर आनंद… हेच खरं आयुष्य!” अशा शब्दांत चाहत्यांनी तिचे कौतुक केलेय. तर काहींनी “मातीचा सुगंध आणि तुझं हसू… मनाला भिडणारं फोटोशूट” असे म्हणाले आहेत.
-
केवळ छोट्या पडद्यावरच नाही, तर नम्रता आता मोठ्या पडद्यावरही धमाका करण्यास सज्ज झाली आहे.
-
भावनांचा गोतावळा घेऊन येणारा या वर्षातील कौटुंबिक महासोहळा म्हणजेच ‘सुपर डुपर’ (Super Duperr Movie) हा नम्रताचा नवा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”