-
ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो.
-
शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील. दरम्यान, या काळात शनीचे अनेकदा नक्षत्र गोचर होईल. ज्याचा प्रभाव नक्कीच काही राशींवर पडू शकतो.
-
पंचांगानुसार, शनी १७ मे २०२६ रोजी दुपारी ०३ वाजून ४९ उत्तरा भाद्रपद नक्षत्रातून रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी नक्कीच अनुकूल सिद्ध होईल. -
मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे हे नक्षत्र परिवर्तन तुमचे आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक कामात यश मिळेल. गुंतवणूक करणे खूपच लाभकारी ठरू शकते. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मानसिक तणाव दूर होईल. मुलांकडून सुख मिळेल.
-
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल.
-
शनीचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे नक्षत्र परिवर्तन खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“उद्या सुनावणी…”, राजपाल यादवच्या जामिनाबद्दल मॅनेजरने दिली महत्त्वाची माहिती; सलमान खान-अजय देवगणकडून मदतीचा हात
