-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो.
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो.
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
-
पंचागानुसार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्य मकर राशीतून शनीदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी याच राशीत ग्रहण लागणार आहे. -
पंचागानुसार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्य मकर राशीतून शनीदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी याच राशीत ग्रहण लागणार आहे.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य ग्रहणाच्या दिवशी कुंभ राशीत निर्माण होणारा पंचग्रही योग खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीतील पंचग्रही योग सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा पंचग्रही योग अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते.
-
कुंभ राशीतील पंचग्रही योग या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”