-
आपल्यातील अनेकांना गोड खायला भरपूर आवडते. गोड पदार्थांमुळे शरीर हळूहळू विषारी बनते. जेवणात गोड पदार्थ आणि साखरेचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. जेव्हा तुम्हाला हळूहळू साखरेचे व्यसन लागते तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव नसते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने असे म्हटले आहे की, जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो. पण, जर तुम्ही १४ दिवस साखरेचे सेवन टाळले, तर तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात. साधारणपणे दोन आठवडे साखरेचे सेवन बंद केल्याने शरीराची काम करण्याची पद्धत हळूहळू पूर्ववत आणि संतुलित होऊ लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एम्स, हार्वर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्ये प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हेपॅटोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी १४ दिवस साखर न खाल्यावर शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल माहिती दिली आहे…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
१४ दिवस साखर न खाल्ल्यास काय होईल?
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, १४ दिवस साखरेचे सेवन न केल्याने तुमच्या आतड्यांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. साखर केवळ कॅलरीज वाढवत नाही, तर नकळत भूक, अन्नाची तीव्र इच्छा, इन्सुलिन आणि यकृतातील चरबी साठवण्यावरदेखील परिणाम घडवून आणते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
म्हणून जेव्हा तुम्ही १४ दिवस साखरेचे सेवन न करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात पुढील बदल घडवून आणू शकता.
क्रेविंग्स, डोकेदुखी, थकवा, चिडचिड, मेंदूतील गोंधळ… (फोटो सौजन्य: @Freepik) -
मेंदू पुन्हा नव्याने रीसेट होतो –
मेंदू स्वतःला पुन्हा नव्याने जुळवून घेतो. साखर बंद केल्यावर मेंदूला जास्त गोड ही साखरेच्या कमतरतेची लक्षणे नाहीत, तर शरीराच्या चांगल्या स्थितीकडे होणारे संक्रमण आहे, ज्यासाठी शरीर स्वतःला तयार करत आहे. ही त्याचीच लक्षणे आहेत. हळूहळू गोड खाण्याची इच्छा कमी होते, ऊर्जा स्थिर होते, पोट फुगणे कमी होते, दुपारचा थकवा कमी होतो आणि तुमची इन्सुलिनची प्रतिक्रिया सुधारते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
हे असं होतं कारण- मेंदू स्वतःला पुन्हा नव्याने जुळवून घेतो (रीसेट होतो). साखर बंद केल्यावर जास्त गोड खाण्याची सवय कमी होते आणि तो नैसर्गिक ऊर्जा आणि आनंदावर पुन्हा काम करू लागतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही अधिक संतुलित वाटू लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोणत्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते?
फक्त गोड पदार्थांमध्ये साखर नसते. अनेक पदार्थांमध्ये तुम्हाला कल्पनाही नसेल त्यापेक्षा जास्त साखर असते. ज्यूस, फ्लेवर्ड दही, तृणधान्ये, सॉस, ड्रेसिंग्ज, बेकरी उत्पादने आणि गोड केलेल्या अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये अतिरिक्त साखर असते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
साखर न खाण्याचे फायदे –
जेव्हा तुम्ही तुमच्या आहारातून साखर पूर्णपणे वगळून टाकता तेव्हा तुम्हाला १४ ते १५ दिवसांतच तुमच्या शरीरात लक्षणीय बदल दिसून येतात. तुमचे पोट कमी होऊ लागते, चांगली झोप लागते, भुकेचे संकेत स्पष्टपणे समजू लागतात, गोड खाण्याची इच्छा कमी होते, रक्तातील साखरेची पातळी सुधारते. त्याचबरोबर या काळात वजनात फारसा बदल झाला नाही तरी चयापचय क्रियेतील बदल निश्चितपणे जाणवतात. १४ दिवस साखरेपासून दूर राहिल्याने इन्सुलिनच्या पातळीतील अचानक होणारी वाढ कमी होते, यकृतावरील साखरेचा भार कमी होतो, शरीरातील पाण्याची साठवण कमी होते, चवीच्या संवेदना पूर्ववत होतात आणि शरीरातील चरबी कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
३० वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींची शनीच्या साडेसातीतून सुटका; गोल्डन टाईम सुरू होत येणार बक्कळ पैसा; श्रीमंतीचं दार खुलं होत मिळणार सुखच सुख
