-
रात्री झोप न येणे ही आपल्यापैकी अनेक जणांची समस्या आहे. या समस्येसाठी कधीतरी आपणच कारणीभूत असतो नाही का? संपूर्ण दिवस हे कामात जात असल्याने “आता मी माझ्यासाठी वेळ काढणार” असं म्हणत रात्री उशिरापर्यंत जागं राहून सिरीयल, वेब सिरीज, चित्रपट किंवा अगदी तासंतास रील बघण्याचे आपण मनाशी ठरवतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, गोष्टींच्या यादीत झोपेचा समावेश नसल्यास तुमचा हा तात्पुरता बदला दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्यामुळे वेळ निघून गेली की, रात्री झोप लागत नाही. मग अशावेळी काय करायचं तर स्वतःच्या वाईट सवयी थोड्या बाजूला ठेवून काही चांगल्या गोष्टी स्वतःला लावायच्या. या चांगल्या गोष्टी कोणत्या त्याच आपण या बातमीतून जाणून घेऊयात…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठताना अलार्म तीन ते चार वेळेला बंद करावा लागतो. मग उठायला उशीर होतो. मग थकवा, चिडचिड आणि ताण येऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जर तुम्ही तासनतास रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी तुम्ही एक विशिष्ट दिनचर्या पाळू शकता. यामुळे दिवसाचा थकवा आणि ताणही कमी होईल.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्क्रीन टाइम कमी करा
आजच्या डिजिटल युगात, झोपण्यापूर्वी मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर राहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या वापरामुळे निळा प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे झोप येणे कठीण होऊ शकते. म्हणून, झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल फोन, टीव्ही आणि लॅपटॉपपासून दूर रहा. झोपण्यापूर्वी तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा अगदी आवडतं संगीत ऐकू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik) -
झोपण्यापूर्वी ध्यान करा
तुम्ही योग किंवा ध्यान देखील करू शकता. दिवसाचा थकवा दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी ध्यान करा. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो, शरीर आरामशीर स्थितीत राहते. तुम्ही काही काळ श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील करू शकता. यामुळे मन शांत होते आणि रात्री शांत झोप लागते.(फोटो सौजन्य: @Freepik) -
दररोज एकाच वेळी झोपा
दररोज एकाच वेळी झोपायला जाण्याची आणि उठण्याची सवय विकसित करणे महत्वाचे आहे. यामुळे शरीराचे अंतर्गत घड्याळ नियंत्रित राहते. अनियमित वेळेवर झोपल्याने वारंवार झोपेचा त्रास होऊ शकतो आणि सकाळी थकवा सुद्धा जाणवू शकतो.(फोटो सौजन्य: @Freepik) -
झोपण्यापूर्वी पायांची मालिश करा
झोपण्यापूर्वी तुम्ही पायांची मालिश देखील करू शकता. पायांची हलकी मालिश मज्जातंतूंना आराम देते, ताण कमी करते; ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते.(फोटो सौजन्य: @Freepik)
३० वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींची शनीच्या साडेसातीतून सुटका; गोल्डन टाईम सुरू होत येणार बक्कळ पैसा; श्रीमंतीचं दार खुलं होत मिळणार सुखच सुख
