-
गोविंदाचा भाचा विनय आनंदने मामाच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या.
-
‘हिंदी रश’ पॉडकास्टमध्ये बोलताना विनय म्हणाला, “मला आयुष्यभर मामाकडून प्रेरणा मिळाली. केवळ मीच नाही, तर जेव्हा ते नंबर वन होते, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्याकडून प्रेरणा म्हणून पाहायचा.”
-
“तेव्हा असा एकही सुपरस्टार नव्हता जो त्यांची नक्कल करत नसेल किंवा त्यांच्यासारखा डान्स करत नसेल,” असं विनय आनंद म्हणाला.
-
ज्यांना डान्स येत नव्हता, त्यांनीही त्यांच्यामुळे नाचायला सुरुवात केली. – विनय आनंद
-
विनय आनंद म्हणाला, “जेव्हा माझ्या आजीचा वाढदिवस असायचा आणि ते घरी यायचे, ते एका ताटात तिचे पाय धुवायचे आणि नंतर तेच पाणी तीर्थ म्हणून प्यायचे.”
-
विनयने यापूर्वी गोविंदाच्या मराठी अभिनेत्रीशी कथित अफेयरच्या अफवांचा आणि सुनीता आहुजाच्या वक्तव्यांबद्दल प्रतिक्रिया दिली.
-
“मला गोविंदाला याबद्दल विचारायचं होतं, पण मी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करतोय, असं त्यांना वाटवं हे मला नको होतं. ते माझे मामा आहे, माझ्या वडिलांसारखे आहेत,” असं विनय आनंदने नमूद केलं.
-
गोविंदाच्या अफेयरच्या चर्चा फार वाढल्यावर एकदा विचारल्याचं विनयने सांगितलं.
-
. “पण मी त्यांना एकदा विचारलं होतं की, तुमचं अफेयर आहे का? तो मला म्हणाला, ‘नाही, असं काही नाहीये.’ त्यांनी नकार दिला, त्यावर माझा विश्वास आहे. पण जेव्हा मी माझ्या मामीच्या मुलाखती पाहतो, तेव्हा थोडं विचित्र वाटतं, कारण आम्ही त्यांना नेहमीच गोविंदाचा आदर करताना पाहिलंय,” असं विनय आनंद म्हणाला.
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”