-
सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी ६’चीच चर्चा रंगली असून, घरातील सदस्यांमधील वाढता संघर्ष आणि रंजक टास्कमुळे या शोची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.
-
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात अभिनेत्री तन्वी कोलतेचा मराठमोळा आणि पारंपरिक साज प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये तन्वीने गडद रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान करून आपला ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे.
-
तन्वीने या लूकवर नाकात पारंपरिक नथ आणि गळ्यात नाजूक ठुशी घालून अस्सल मराठी सौंदर्याचे दर्शन घडवले आहे.
-
बिग बॉसच्या सोफ्यावर बसून विचारमग्न असलेल्या तन्वीचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
-
केसांची साधी पण मोहक ठेवण आणि चेहऱ्यावरील हावभावांमुळे तन्वीच्या या सावळ्या सौंदर्याचे चाहते मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.
-
तन्वीने ‘झी मराठी’वरच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ‘सिंचना’ ही भूमिका साकरली होती.
-
महाराष्ट्रीयन अशा संस्कृतींचा मेळ तिच्या या एकूण पेहरावामध्ये आणि दागदागिन्यांमध्ये जाणवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य: तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत