-
हिंदू धर्मातील विविध महत्वाच्या सणांपैकी एक असलेली होळी पौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला रात्री होलिका दहन केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. पुढे पाच दिवसांनी रंगपंचमी असते.
-
यंदा ३ मार्च २०२६ रोजी होळी पौर्णिमा साजरी केली जाईल. हा खास दिवस ज्योतिषशास्त्रातही खूप खास मानला जात आहे.
-
पंचांगानुसार, ०३ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांच्या आसपास चंद्र सिंह राशीत राहून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. तर ११ वाजून ०२ मिनिटांनी मंगळ कुंभ राशीत राहून शततारका नक्षत्रात प्रवेश करेल.
-
या दोन्ही ग्रहांचे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल.
-
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ-चंद्राचे हे गोचर अत्यंत अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे, तर नोकरीपेशा लोकांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मोठ्या निर्णयांसाठी आणि गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील.
-
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ-चंद्राचे हे गोचर लाभप्रद ठरू शकते. ज्यामुळे या काळात भाग्याचा साथ मिळेल. या काळात देश-विदेश प्रवास करण्याची संधी येईल आणि ते शुभ राहतील. धर्म-कर्माच्या कार्यांमध्ये रस वाढेल.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ-चंद्राचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकते. हा योग धन भावावर आधारित असल्यामुळे आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. युवावर्ग आपल्या बचतीने इच्छित वस्तू खरेदी करू शकेल.
-
वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?