-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ग्रहांचे गोचर पाहायला मिळेल. एकाच वेळी काही ग्रह एकाच रेषेत सक्रिय होतील.
-
पंचांगानुसार, सध्या गुरू मिथुन राशीत असून शनी मीन राशीत विराजमान आहे. बुध-शुक्र ग्रह कुंभ राशीत विराजमान असेल.
-
फेब्रुवारीच्या शेवटी मंगळ-चंद्र कुंभ राशीत राहून ऊर्जा आणि शक्ती वाढवतील. ज्याचा शुभ प्रभाव नक्कीच १२ पैकी काही राशींवर पाहायला मिळतो.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील.
-
सिंह राशीच्या लोकांसाठीही ग्रहांचे गोचर खूप लाभदायक ठरेल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल.
-
तूळ राशीच्या लोकांसाठीही या ग्रहांचे गोचर खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल.
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारीच्या शेवटी होणारे हे गोचर खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
Iran Air Flight 655 US Navy Attack History: अमेरिकेची एक चूक अन् होर्मुझच्या सामुद्रधुनीत २९० प्रवाशांना जलसमाधी; ३७ वर्षांपूर्वी इराणी विमान का लक्ष्य केलं होतं?