-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.
-
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र हे सध्या कुंभ राशीत असून २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्राचे पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर होईल. त्यानंतर होळीच्या दोन दिवस आधी शुक्राचे मीन राशीत गोचर होईल.
-
२२ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात शुक्र तब्बल दोन वेळा गोचर करेल. शुक्राचे हे गोचर १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे दोन वेळा होणारे गोचर खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
-
शुक्राचे दोन वेळा होणारे गोचर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे दोन वेळा होणार गोचर अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल.
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे दोन वेळा होणारे गोचर खूप लाभदायक सिद्ध होईल. या काळात अचानक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…