-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.
-
पंचांगानुसार, मंगळ २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळ मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असून मंगळाच्या कुंभ राशीतील प्रवेशाने कुंभ राशीत ग्रहांचे शक्तीशाली महागोचर पाहायला मिळेल.
-
कुंभ राशीत आधीपासूनच राहू, बुध, सूर्य, शुक्र हे चार ग्रह उपस्थित आहेत. मंगळाच्या कुंभ राशीतील प्रवेशाने या राशीत पाच ग्रहांचा महासंगम होईल. या शुभ गोचराने नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल.
-
मंगळाच्या कुंभ राशीतील प्रवेशाने या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पंचग्रही योग खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी पाच ग्रहांचा पंचग्रही योग खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. -
मंगळाचा कुंभ राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
“त्याने सामना इंग्लंडपासून दूर नेला…”, सूर्याचं विजयानंतर मोठं वक्तव्य, कोणत्या खेळाडूचं नाव घेत केलं कौतुक?