-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. -
पंचांगानुसार, २०२६ मध्ये केतू चार वेळा नक्षत्र गोचर करेल. तर एक वेळा राशी परिवर्तन करेल. केतू सध्या सिंह राशीत असून तो ५ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ०७ वाजून २८ मिनिटांनी सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. -
केतूचा कर्क राशीत प्रवेश होण्यासाठी अद्याप ९ महिने बाकी आहेत. तोपर्यंतचा काळ नक्की कोणकोणत्या राशीसाठी लाभदायक ठरेल हे आपण जाणून घेऊ
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी केतू राशी गोचर खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आर्थिक समस्या जाणवणार नाही.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम आणि AI)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…