-
राम लाडू हा दिल्लीच्या रस्त्यांच्या कोपऱ्यांवर मिळणारा फक्त एक कुरकुरीत नाश्ता नाही. त्यात स्थलांतर, स्थानिक कल्पकता आणि शहराच्या ठळक चटण्या आणि पोत यांच्या प्रेमाचे स्वाद आहेत. हा साधे मसूरचा पक्वान्न आता जुन्या काळातील दिल्लीच्या स्ट्रीट फूड संस्कृतीचे प्रतीक बनला आहे. (इंस्टाग्राम: सरंशगोइला)
-
राम लाडू चणा डाळ, मूग डाळ यांच्यापासून तयार केला जातो. मात्र हा भज्यांपेक्षा कुरकुरीत असतो. जेव्हा तुम्ही राम लाडू खायला मागता तेव्हा तो छान कुरकुरीत राम लाडू तळतो आणि तो कुस्करुन त्यावर चटण्याचं मिश्रण, कांदा, मूळा किसून घालून देतो. अनेकांना आवडणारा हा नाश्ता आहे. (इंस्टाग्राम: कुलिनरीचेझर)
-
राम लाडू हे नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हा गोड पदार्थ आहे. पण तसं मुळीच नाही. आपल्याकडे जशी मूग भजी मिळतात त्यांच्यापेक्षा कुरकुरीत असा हा खास पदार्थ आहे. राम लाडू गोल आकारात तळला जातो म्हणून त्याला लाडू हे साधं सोपं नाव पडलं आहे. स्ट्रिट फूड म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे.
-
राम लाडू हा पकोड्याच्याच एक पाऊल पुढे जाणारा प्रकार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. द्रोणात तो कुस्करून खायला दिला जातो. उत्तर प्रदेशातल्या काही भागांतून हा पदार्थ दिल्लीकडे आला आणि दिल्लीचाच झाला. (फेसबुक: शालिनीप्रिया सिंह)
-
राम लाडू खायला चवदार लागतो तो त्यावर घालण्यात येणाऱ्या विविध जिन्नसांमुळे. किसलेला मुळा,मसालेदार हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा या सगळ्या गोष्टी राम लाडू या पदार्थाची लज्जत वाढवतात.(इंस्टाग्राम: संकल्पविष्णु)
-
उत्तर प्रदेशातल्या स्ट्रिट फूड संस्कृतीतच राम लाडू या पदार्थाची मूळं आहेत. आता लाजपत नगर, करोल बाग, चांदणी चौक या ठिकाणी मिळणारा उत्तम नाश्ता म्हणजे राम लाडू अशीच या भागांची ओळख झाली आहे.बनला. (यूट्यूब: रसोई पॅलेस)
-
हिवाळ्याच्या संध्याकाळी दिल्लीतल्या रस्त्यांवर राम लाडूची चव घेणं याची मजा काही औरच आहे यात काही शंका नाही. हा पदार्थ जसा पूर्वी मिळत होता तसाच आजही आहे आणि तो हातानेच खाल्ला जातो. राम लाडू खाल्ला नाही असा दिल्लीकर सापडणं विरळाच.(फेसबुक: कालीमिर्च द्वारे स्मिता)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…